IMPIMP

मनसुख हिरेन प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘त्या’ स्कॉपियोचा मालक दुसराच !

by bali123
mansukh hiren case real owner scorpio found outside mukesh ambanis house different

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो गाडी आढळली होती. त्यानंतर मनसुख हिरेन mansukh hiren यांचा मृतदेह संशयास्पद आढळला. या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन mansukh hiren असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता यावर एक नवी माहिती समोर आली आहे. मुकेश अंबानी यांच्या इमारतीबाहेर आढळलेली स्कॉर्पिओचे खरे मालक मनसुख हिरेन mansukh hiren नसल्याचे समोर आले आहे.

स्कॉर्पियो कार प्रकरणी मनसुख हिरेन यांची मुंबई गुन्हे शाखा आणि एटीएसकडून चौकशी सुरु होती. मात्र, चौकशीदरम्यान त्यांचा मृतदेह सापडल्याने गृहमंत्र्यांनी याप्रकरणाचा तपास एटीएसकडे दिला आहे. याप्रकरणाची चौकशी सुरु होती. पण आता मनसुख हिरेन यांची पत्नी विमला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 7 मार्चला एटीएसने गुन्हा दाखल केला आहे. विमला यांनी एटीएसने दिलेल्या जबाबात अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. विमला हिरेन यांनी दिलेल्या जबाबात नोव्हेंबर 2020 ते 6 मार्च पर्यंतचा घटनाक्रमाची माहिती दिली. त्याच्या या जबाबातून मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्कॉर्पियो कारचा खरा मालक डॉ. पिटर न्यूटन असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, मनसुख यांचे क्लासिक कार डेकोर नावाचे ठाण्यात ऑटोमोबाईल ऍक्सेसरीज विक्रीचा व्यवसाय आहे.
व्यवसायातील ग्राहक डॉ. पिटर न्यूटन यांच्या मालकीची महिंद्र स्कॉर्पिओ कार क्रमांक MH.02.AY.2815 ही गेल्या 3 वर्षांपासून त्यांच्या समंतीने आमच्या ताब्यात होती, असे म्हटले आहे.

खळबळजनक ! मनसुख हिरेन यांची हत्या पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी केल्याचा संशय; फडणवीसांचा आरोप

वृद्ध सफाई कामगाराचा गळा कापून हत्या

Related Posts