IMPIMP

खळबळजनक ! मनसुख हिरेन यांची हत्या पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी केल्याचा संशय; फडणवीसांचा आरोप

by bali123
police officer sachin waze killing mansukh hiren devendra fadnaviss allegations

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी पुन्हा एकदा सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस यांनी आज (मंगळवार) अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे अधिवेशनात एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी अधिवेशनात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थितीत केला आहे.

यावेळी त्यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी पोलिसांना दिलेला जबाबच सभागृहात वाचून दाखवला. देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेली तक्रार वाचून दाखवली. 26 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी माझे पती चौकशीसाठी सचिन वाझे यांच्या सोबत गुन्हे शाखेत गेले. त्यानंतर साडेदहा वाजता आले. दिवसभर सचिन वाझेंसोबत होतो असं मला त्यांनी सांगितले. 27 फेब्रुवारीला सकाळी माझे पती पुन्हा मुंबई गुन्हे शाखेत गेले आणि रात्री साडेदहा वाजता आले. त्यानंतर 28 फेब्रुवारीला पुन्हा एकदा सचिन वाझेंसोबत गेले आणि जबाब नोंदवला. जबाबाची प्रत घरी आणून ठेवण्यात आली. त्यावर सचिन वाझे यांची स्वाक्षरीदेखील आहे, असं तक्रारीत नमूद असल्याची माहिती फडणवीस यांनी सभागृहाला दिली. ते पुढे म्हणाले की, याचाच अर्थ दुसऱ्या कोणीही त्यांची चौकशी केलेली नाही. तिन्ही दिवस ते सचिन वाझे सोबत होते.

हिरेन यांची चौकशी फक्त वाझे यांनी केली आणि वाझे यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली होती. चौकशी झाल्यानंतरही जो तक्रार अर्ज देण्यात आला तोही वाझे यांच्या सांगण्यावरून दिला होता. वाझे यांनी माझ्या पतीला अटक करून घ्यायला सांगितले होते, मग दोन तीन दिवसांत बाहेर काढू असं सांगितले, असा खुलासा फडणवीस यांनी केला.

फडणवीस म्हणाले, मनसुख हिरेन यांनी भावाशी व वकिलांशी बोलून घेण्यास सांगितले होते. हा खून वाझे यांनी केला असावा माझा संशय आहे. 2017 मध्ये एफआयआर दाखल असून, 40 लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणात धनंजय गावडे, सचिन वाझे यांची नावे समोर आली. मनसुख यांचं शेवटचं लोकेशन गावडेकडे होतं आणि त्यानंतर 40 किमी दूर मृतदेह आहे. मुंब्र्याच्या खाडीत फेकण्यात आला. मात्र, ओहोटी असल्याने मृतदेह बाहेर आला, असे फडणवीस म्हणाले.

सचिन वाझे यांच्याविरोधात एवढे पुरावे असताना 302 गुन्ह्याखाली अटक करावी. हा राजकारणाचा विषय नाही, पण थेट पुरावे असतानाही अटक होत नसेल तर कोण आणि कशासाठी वाचवत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. फडणवीस यांच्या आरोपानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

Related Posts