IMPIMP

Maratha Reservation : ‘…. तर परिणाम संपूर्ण राज्यभरात पहायला मिळतील’, विनायक मेटेंचा ठाकरे सरकारला इशारा (व्हिडीओ)

by omkar

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन – मराठा समाजावरील अन्याय सरकारने दूर करावा. अन्यथा मराठा समाजाला सरकारचं भविष्य ठरवावं लागेल, असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (vinayak mete) यांनी दिला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा मागील वर्षीप्रमाणे मराठे मोर्चे सुरु होतील, असेही विनायक मेटे यांनी म्हटले आहे. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मराठा मोर्चावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

‘काँग्रेस केंद्रात सत्तेवर येणार असेल, तर त्या सारखी ऐतिहासिक गोष्ट नाही’; नाना पटोलेंच्या विधानावर संजय राऊतांचा टोला

सरकारने दखल घेतली नाही, तर…

मोर्चाला झालेली गर्दी पाहता, तरुणांमध्ये किती रोष आहे हे दिसत आहे.
परंतु हा रोष सरकारला दिसत नाही. म्हणून हे सर्वजण संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
जर सरकारने याची दखल घेतली नाही, तर याचे परिणाम संपूर्ण राज्यभरात पहायला मिळतील, असा इशारा विनायक मेटे (vinayak mete) यांनी दिला आहे.

हा सरकारचे वाभाडे काढणारा मोर्चा

विनायक मेटे म्हणाले, मी आता जसं आवाहन केलं तसंच आवाहन सुरुवातीपासून करतो आहे.
हा मूक मोर्चा नाही घोषणा देत सरकारचे वाभाडे काढणारा मोर्चा आहे.
अन्यायाला वाचा फोडणारा मोर्चा आहे, असेही मेटे म्हणाले.

कोरोना नियमांचे उल्लंघन

मराठा आरक्षणाच्या मोर्चासाठी बीड येथील शिवाजी चौकात मोठ्या संख्येने लोक जमले होते.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मोर्चा प्रसंगी कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले.

आगोदर मुक मोर्चा नंतर घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाला.
आगोदरचे मराठा मोर्चे हे मुक मोर्चे होते.
परंतु आजच्या मोर्चात मोठ्याप्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

Also Read:- 

Ajit Pawar : ‘…तो पर्यंत कोणी मायेचा लाल महाविकास सरकार पाडू शकणार नाही’

Pravin Darekar : ‘… तर सरकार कधी कोसळेल हे देखील त्यांना कळणार नाही’

‘राज-उद्धव’ एकत्र येणार ?, खा. संजय राऊत म्हणाले…

Devendra Fadnavis : उत्तरप्रदेशातील गंगेतील मृतदेहांची महाराष्ट्रात चर्चा होते, पण…

Ajit Pawar : ‘प्री-वेडिंग’ शूटच्या माध्यमातून पर्यटन विकास साधा !

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे नवं ट्वीट

Dark Mode : डार्क मोडमध्ये कधीही वापरू करू नका स्मार्टफोन, जाणून घ्या कारण

Maratha Reservation : मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ 2 महत्वाचे कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

 

Related Posts