IMPIMP

MLA Abu Azmi | वाढदिवसानिमित्त काढली भव्य मिरवणूक; अबू आझमींसह अन्य कार्यकर्त्यांवर FIR दाखल

by nagesh
mla abu azmi birthday rally mla abu azmi filed a case against party workers in mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने (Maharashtra Government) राज्यात निर्बंध लावले आहेत. मात्र सध्या ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) अधिक आहे त्याठिकाणी शासनाने मुभा दिली नाही. उर्वरित ठिकाणी निर्बंध शिथिल केले आहेत. असं असलं तरी कोरोनाची परिस्थिती आहे, म्हणून कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे शासनाने म्हटले. परंतु सर्वसामान्य लोकांना जरी निर्बंध असले तरी राजकीय नेत्यांचे वाढदिवस, कार्यक्रम सुरूच आहे. यातच आता काल (रविवारी) मुबई शिवाजी नगर गोवंडी विभागातील समाजवादी पक्षाचे (Socialist Party) आमदार अबू आझमी (MLA Abu Azmi) यांच्या वाढदिवसानिमित्त (birthday) आझमी यांची भव्य मिरवणूक रथामधून काढली गेली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार अबू आझमी (MLA Abu Azmi) यांच्यासहित अन्य जणांवर गुन्हा (FIR) दाखल झालं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

रविवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीमुळे आमदार अबू आझमी (MLA Abu Azmi) यांच्यासह अन्य
त्यांच्या कार्यकर्त्यावर मुंबईत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वाढदिवशी दरम्यान,
तलवारीने केक कापणे आणि कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असं पोलिसांनी संगीतल आहे. काल रविवारी असलेल्या वाढदिवसा दरम्यान, शेकडोच्या संख्येने त्यांचे
कार्यकर्ते रॅली मध्ये सहभागी झाले होते. यावेळी फटाके फोडून, घोषणा देत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली
होती. तर, आमदार आझमी यांनी हातात तलवार घेऊन तिचे प्रदर्शन देखील केले. यावेळी पोलीस मात्र, बघाच्या भूमिकेत दिसून आले. म्हणून, त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान, अबू आझमी (MLA Abu Azmi) यांना विचारले असता त्यांनी हे कार्यकर्त्यांचे प्रेम असल्याचे सांगितले आहे. तर, ती तलवारी मारण्यासाठी नव्हती, आम्ही पूरग्रस्तांना मदत गोळा करीत आहोत अशी सारवासारव केलीय.

 

दरम्यान, या प्रकरणी आमदार अबू आझमी यांच्यासह शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivajinagar
Police Station) कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधक आदेश व जमावबंदी आदेशाचा भंग केला. तसंच अबू
आझमी व समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते फवाद खान ऊर्फ आझमी यांनी विनापरवाना तलवार हे हत्यार
बाळगलं असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आमदार अबू आझमी (MLA Abu Azmi), फहाद खान उर्फ आझमी, इरफान खान, गैसउददिन शेख, आयशा खान, अक्तर कुरेशी, मनोज सिंग, सद्दाम खान, तौसीफ खान, जावेद सिद्दिकी, नौशाद खान, वसिम जाफर शेख, अकबर खान, इर्शाद कुरेशी ऊर्फ बबलू लोटस, रईसा सय्यद, शेहजाद ऊर्फ सय्यद, शकील पठाण, रुक्साना सिद्दिकी आणि अन्य काही अनोळखी अज्ञातांवर गुन्हा दाखल (FIR) केला आहे.

 

Web Title : mla abu azmi birthday rally mla abu azmi filed a case against party workers in mumbai

 

हे देखील वाचा :

Crime News | 7 वर्षाच्या मुलास साखळीने बांधून ठेवायची आई, ड्रग्ज देऊन मारण्यापूर्वी लिहून घेतले – ’मी आहे सर्वात वाईट मुलगा’

Devendra Fadnavis And Amit Shah | फडणवीस HM अमित शाहांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल; भाजप नेत्यांची खलबतं, चर्चेला उधाण

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या वादात महिलेने चावा घेऊन तोडले तरूणाचे बोट, खडकमध्ये FIR

 

Related Posts