IMPIMP

Devendra Fadnavis And Amit Shah | फडणवीस HM अमित शाहांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल; भाजप नेत्यांची खलबतं, चर्चेला उधाण

by nagesh
devendra fadnavis and amit shah bjp leader devendra fadnavis and amit shah meet in delhi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Devendra Fadnavis And Amit Shah | महाराष्ट्रातील भाजपचे (BJP) काही प्रमुख नेतेमंडळी मागील दोन दिवसापासून भेटीगाठीसाठी दिल्लीत (Delhi) ठाण मांडून आहेत. त्यातच आता आज (सोमवारी) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री  तथा सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीसाठी दिल्लीत आहेत. या भेटी दरम्यान काही महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. फडणवीस आणि शाह यांच्या भेटीमुळे राज्यातील राजकरणात चर्चेला उधाण आलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मागील दोन दिवस झाली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे दिल्लीत दाखल झाले आहेत. यानंतर आता देवेंद्र फडणवीस देखील आजच दिल्लीत दाखल झालेत. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांची थेट वारी दिल्लीत गेल्यामुळे. राजकीय वर्तुळात चर्चा जोर धरू लागली आहे. त्याचबरोबर दुसरीकडे भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी भाजप (BJP) नेत्यांची बैठक आयोजित केल्याचे समजते. या बैठकी दरम्यान मराठा आरक्षण आणि अन्य मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, फडणवीस आणि शाह यांची भेट नेमकी कोणत्या विषयांवर आहे याकडे लक्ष लागून आहे.

दरम्यान, शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे दिल्लीत दाखल झाले. तर आज पाटील यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली आहे. त्यांनतर पाटील यांनी पत्रकारांशी सवांद सांधला. त्यावेळी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, पुढे ते म्हणाले, पहिल्यांदाच केंद्रात राज्याला जास्त मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी दिल्लीत आलो. दिल्ली दौऱ्यामागे काहीच राजकीय हेतू नाही, असं सांगतानाच या मंत्र्यांची खाती समजून घेतली. त्याचा राज्याला कसा फायदा होईल, यावर देखील चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

 

Web Title : devendra fadnavis and amit shah bjp leader devendra fadnavis and amit shah meet in delhi

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या वादात महिलेने चावा घेऊन तोडले तरूणाचे बोट, खडकमध्ये FIR

Fact Check | महिन्यात ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास लागणार 173 रुपयांचा टॅक्स? जाणून घ्या सत्य

Pune Crime | पुण्याच्या उत्तमनगरमध्ये गुंडावर गोळीबाराचा ‘थरार’; दुचाकीवरुन आलेल्या गुंडांनी झाडल्या 6 गोळ्या, प्रचंड खळबळ

Anti Corruption | बारामतीमध्ये कर्मचार्‍याकडून लाच मागणार्‍या उपविभागीय अभियंत्यावर गुन्हा दाखल, प्रचंड खळबळ

 

Related Posts