IMPIMP

MLA Gopichand Padalkar | ‘आर्यन खान या नशेबाज पोराला वाचविण्यासाठी ठाकरे सरकारचा आटापिटा’ – गोपीचंद पडळकर

by nagesh
Gopichand Padalkar On Thackeray Government | mahavikas aghadi conspiracy to deprive obc of political representation allegation of bjp leader gopichand padalkar

सरकारसत्ता ऑनलाइन  – MLA Gopichand Padalkar | भाजपाचे (BJP) विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) हल्लाबोल केला आहे. आर्यन खान (Aryan Khan) या नशेबाज पोराला वाचविण्यासाठी यांनी तर जिवाचा आटापिटा चालवला आहे, अशी जोरदार टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul) यांच्या वाढदिवसानिमित्त भांडगाव ग्रामविकास प्रतिष्ठानच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यावेळी पडळकर बोलत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

त्यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) म्हणाले की, राज्यात नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आघाडी सरकारचे लक्ष नाही.
कोविड महामारी रोखण्यावर लक्ष नव्हते. शेतकरी व एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवर लक्ष नाही.
आरोग्य खात्याच्या परीक्षेवर लक्ष नाही. सहकारी साखर कारखाने यांनीच अडचणीत आणायचे आणि नंतर लिलाव काढून कवडीमोल किमतीने ते विकत घ्यायचे, यावर सरकारचे लक्ष आहे.
आर्यन खानऱ्या नशेबाज पोराला वाचविण्यासाठी यांनी तर जिवाचा आटापिटा चालवला आहे.

 

दौंड तालुक्यातील 21 स्वातंत्र्यसैनिकांचा मरणोत्तर सन्मान, कोविड योद्धा सन्मान पत्र, रक्तदान शिबिर, कब्बडी स्पर्धा आयोजित केली होती.
त्यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, कांचन कुल, कीर्तनकार सुमंतबापू हंबीर, हरिभाऊ पाटसकर,
उपसरपंच नीलम दोरगे, लक्ष्मण काटकर, लक्ष्मण दोरगे, राहुल खळदकर, रामदास दोरगे आदी उपस्थित होते.

 

पुढे गोपीचंद पडळकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींनी राज्यातील 55 साखर कारखाने कवडीमोल किमतीने विकत घेतले आहेत.
इतर तालुक्यांवर अन्याय करून त्यांचा निधी बारामतीकडे वळविला आहे. असं देखील पडळकर यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : MLA Gopichand Padalkar | aryan khan bjp mla gopichand padalakar criticism thackeray government

 

हे देखील वाचा :

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 1,095 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Parambir Singh | ‘परमबीर सिंग आदित्य ठाकरेंच्या जवळचे, कुठे पळून गेले त्यांना विचारा’, भाजप आमदाराचा गंभीर आरोप

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 54 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts