IMPIMP

नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंना इशारा, म्हणाले -‘आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अन्यथा सगळी प्रकरणं बाहेर काढू’

by pranjalishirish
mla nitesh ranes reply to varun sardesai all criminal cases against shivsena will be disclose

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- मनसुख हिरेन प्रकरण आणि अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांची गाडी यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. यातच पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केल्याने ठाकरे सरकारभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे nitesh rane यांनी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर वरुण सरदेसाई यांनी राणे कुटुंबावर हल्लाबोल केला. तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यावर आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर निशाणा साधत इशारा दिला आहे.

नितेश राणे nitesh rane यांनी आज पत्रकार परिषद घेत वरुण सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारण्याचा मला अधिकार आहे. तपास यंत्रणांनी मागणी केल्यास त्यांना आम्ही पुरावे देऊ. वरुण सरदेसाई यांच्याकडून जे काही स्पष्टीकरण देण्यात आले ते म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असे म्हणावे लागेल अशी टीका नितेश राणे यांनी केली.

तुमची सगळी अंडीपिल्ली माहित आहेत

आम्ही 39 वर्षे बाळासाहेब ठाकरेंची सेवा करत होतो, त्यामुळे आम्हाला सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. आमच्या कुटुंबावर खालच्या पातळीचे आरोप केले तर तुमची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू. आम्हाला तोंड उघडायला लावायचं असेल आणि रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल, नंदकुमार चर्तुवेदी असे अनेक विषय बाहेर काढायची तयारी असेल तर पाठवा आम्हाला कायदेशीर नोटीस. पुन्हा अशी एक पत्रकार परिषद घेऊन सगळं बाहेर काढेन, त्यामुळे आम्हाला धमकी देऊ नये असा इशारा त्यांनी वरुण सरदेसाईंना दिला.

काय म्हणाले वरुण सरदेसाई ?

आमदार नितेश राणे nitesh rane यांनी पत्रकार परिषद घेऊन वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे सांगितले. युवासेनेचे काम करत असताना आपण आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करत असतो. आम्ही सुसंकृत आणि उच्चशिक्षित कुटुंबातील असल्याचे वरुण सरदेसाई यांनी सांगितले. तसेच नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या मागील काही पत्रकार परिषदांचा आधार घेत त्यांच्यावर निशाणा साधला. आपल्यावर वाझे प्रकरणात करण्यात आलेले आरोप हे गंभीर असून आरोप कोणत्याही तपास यंत्रणेच्या माध्यमातून सिद्ध करुन दाखवा. अन्यथा माफी मागावी. सात दिवसांत माफी मागीतली नाही तर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहा, असा इशारा वरुण सरदेसाई यांनी दिला होता.

Also Read : 

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

Related Posts