IMPIMP

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली HM अमित शाह यांची भेट !

by pranjalishirish
mla shivendra raje met amit shah in delhi sugar factory issue

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – साताऱ्याचे आमदार अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे Sugar factory  मार्गदर्शक व संचालक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. अशी माहिती आहे की, बुधवारी झालेल्या या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या आमदार व खासदारांनी साखर कारखानदारीच्या प्रश्नांवर अमित शाह यांच्याशी चर्चा केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या आमदार व खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतली. साखर कारखान्यांना Sugar factory भेडसावत असलेल्या प्रश्नांसंदर्भात या भेटीत चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनीही साखर कारखान्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. साखर कारखानदारांना केंद्र स्तरावरून मदत व्हावी यासाठी या भेटीचं प्रयोजन होतं असं बोललं जात आहे.

यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, पंकजा मुंडे, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, राहुल कूल, पृथ्वीराज देशमुख यांच्यासह साखर कारखानदारीशी Sugar factory संबंधित असलेले आमदार व खासदार उपस्थित होते.

दरम्यान देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत.
राज्यात महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपनं आपली मोट बांधली आहे.
फडणवीस यांच्यासोबत भाजपचे आमदार व खासदार देखील उपस्थित आहेत.
यामुळं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्याचं दिसत आहे.

Also Read : 

WB Elections : ममतादीदींकडून आश्वासनांची बरसात

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

‘मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात’, मनसेचा व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा

Related Posts