IMPIMP

Governor appointed MLA | विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी राज्यपालांकडेच असल्याची माहिती समोर

by omkar
Governor appointed MLA

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन –  विधानपरिषदेच्या 12 सदस्यांचा कार्यकाळ जूनमध्ये (2020) संपुष्टात आला. या रिक्त जागांसाठी महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी (Governor appointed MLA) 12 जणांची यादी निश्चित करण्यात आली होती.
तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषद सदस्य नियुक्ती करण्यासाठी 12 जणांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांच्याकडे पाठवण्यात आले होते.
या प्रलंबित प्रकरणामुळे राज्यपाल आणि राज्य सरकार वाद उफाळला आहे.
मधील काही दिवसात ती यादी गहाळ झाल्याची माहिती आली होती.
मात्र ही 12 सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांच्याकडेच असल्याची माहिती समोर आलीय.

Antilia Bomb Scare Case | अँटिलिया प्रकरणात NIA ने दोन जणांना केली अटक, लातूर कनेक्शन उघड

 राज्यपाल नियुक्त सदस्य 12 जणांची यादी ही माहिती अधिकारात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआयचे (RTI) कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली होती.

मात्र, आज (मंगळवार) 15 जून रोजी राजभवन सचिवालयात यासंदर्भात RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिलेल्या आव्हान याचिकेवर सुनावणी झाली.
त्यामध्ये ती 12 जणांची यादी राज्यपालाने स्वतःकडे ठेवली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तसेच आता राज्यपालांने याबाबत निर्णय घेतल्यावरच माहिती मिळणार असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, राज्यपालांनी मागील 8 महिन्यांपासून राज्य सरकारने पाठवलेल्या राज्यपाल नियुक्त सदस्य 12 जणांच्या यादीवर कोणताच निर्णय घेतला नसल्याचं पुढं आलं आहे.

Former Uttarakhand CM Trivendra Singh Rawat on Vaccination | ‘मुस्लीम समाजातील लोक कोविड लस घेण्यास टाळाटाळ करतात’

काय नेमकं घडलं आहे ?
22 एप्रिल (2021) रोजी ‘मुख्यमंत्री महोदय / मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपाल नामीत विधानपरिषदेवर आमदार नियुक्तीबाबत राज्यपाल महोदयांकडे सादर केलेली यादी देण्यात यावी.
RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे याबाबत माहिती मागितली होती.
आणि मुख्यमंत्री महोदय/ मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपाल नामीत विधानपरिषदेवर सदस्य नेमणुकी बाबत
राज्यपाल महोदयांकडे सादर केलेल्या प्रस्तावाची सद्यस्थितीची माहिती देण्यात यावी. असा अर्ज त्यांनी केला होता.

RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अर्जावर 19 मे (2021) रोजी
राज्यपाल सचिवालयाचे अवर सचिव जयराज चौधरी यांनी उत्तर देत म्हटलं होत की,
‘राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारांची यादी जन माहिती अधिकारी (प्रशासन)
यांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याने, आपणांस उपलब्ध करुन देता येत नाही, असं सांगण्यात आलं होत.

 Web Title : MLA’s appointed by Governor governor bhagat singh koshyari keeps list of 12 mlas of legislative council to himself

Related Posts