IMPIMP

खा. मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्यांची नावं, चौकशीबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

by sikandershaikh
devendra-fadanvis-mohan-delkar

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)mohan delkars suicide | मुंबईत आजपासून (सोमवार दि 1 मार्च 2021) राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) वरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. दरम्यान दादरा-नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर (Mohanbhai Delkar) यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. त्यांच्या खोलीतील सुसाईड नोटमध्ये भाजपच्या नेत्यांची नाव असल्याचा दावा करण्यात आला होता. राज्य सरकरानं यावरून चौकशी करण्याची घोषणा केली होती. या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. यावर बोलताना भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा सल्ला सरकारला दिला.

‘सुसाईड नोटमध्ये कुठल्याही भाजप नेत्याचं नाव नाही’

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आत्महत्या कुणाचीही असो, त्याची चौकशी झाली पाहिजे. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या (mohan delkars suicide) ठिकाणी सुसाईड नोट सापडली आहे. सुसाईड नोट सापडल्यानंतर चौकशी ही होतेच. कुणीही आरोप करत असले तरी या सुसाईड नोटमध्ये कुठल्याही भाजप नेत्याचं नाव नाही असं मी दाव्यानिशी सांगू शकतो. जर त्यात भाजप नेत्याचं नाव असतं तर अद्याप जाहीर केलं असतं असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला.

यावेळी बोलताना फडणवीसांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली.
ते म्हणाले, कालच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. अशी स्थिती त्यांच्यावर येऊ नये.
धडधडीत खोटं बोलावं लागतं तेव्हा नैतिक धैर्य येत नाही. मुख्यमंत्र्यांनी चेहऱ्यावर मास्क लावला असतानाही ते दिसत होतं असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

पुढं बोलताना फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावरून टीका करण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु पूजा चव्हाण प्रकरणात समोर आलेल्या क्लीप्स खऱ्या की खोट्या, यवतमाळच्या रुग्णालयात जे घडलं
ते खरं की खोटं याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं.
कुणाला साधूसंत ठरवायचं असेल तर ठरवा.
मात्र तुमच्या नैतिकतेचं काय ? असा सवालही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.

Related Posts