IMPIMP

MP Amol Kolhe | ‘ज्यात आपलं काडीचंही योगदान नाही, त्याबद्दल बोलून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करू नये’ – अमोल कोल्हे

by nagesh
MP Amol Kolhe | freedom fighters should not be insulted talking about independence amol kolhe kangana ranaut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MP Amol Kolhe | देशाला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, त्या अगोदरचं स्वातंत्र्य हे भीकमध्ये मिळालं होतं, असं वादग्रस्त वक्तव्य करणा-या अभिनेत्री कंगना रणौतवर (Kangana Ranaut) देशभरातून जोरदार टीका होत आहे. राज्यमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनीही कंगणाच्या विधानावरुन टीका केली. तसेच, राष्ट्रवादीचे (NCP) खासदार अमोल कोल्हेंनीही (MP Amol Kolhe) कंगनाच्या विधानावरून निशाणा साधला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

खा. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) म्हणाले, ज्या हजारो देशभक्तांनी, क्रांतीकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.
अवघ्या 23 व्या वर्षी फासावर असणाऱ्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या सर्वांचं बलिदान, ज्यांनी आपलं रक्त सांडलं, या सगळ्यांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला.
गेल्या 75 वर्षात देश ज्या उत्क्रांतीतून गेलाय, त्या अनुषंगाने हे अत्यंत दुर्दैवी विधान आहे. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केलाय, त्यांचा हा अपमान आहे.
ज्यांनी हे विधान केलंय, त्यांनी आत्मपरिक्षण करावं. ज्या गोष्टीत आपलं काडीचंही योगदान नाही.
त्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बोलून त्यांचा अपमान करू नये, देशाचा अपमान करू नये, असं अमोल कोल्हे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, कोणी म्हणत असेल हा देश भगव्याचा आहे हिरव्याचा नाही. मग, रुग्णालयात पेशंट मरत असेल, त्याला रक्ताची गरज असेल.
तेव्हा तुम्ही म्हणाल का, हा पेशंट मरू द्या, त्याला भगव्याचं रक्त असेल तरच देणार.
जर हिरवा असेल तर त्याला हिरव्याचंच रक्त देणार? असा सवालही अमोल कोल्हे यांनी विचारला.
तर, मानवता हीच त्यापलिकडची गोष्ट आहे, वसुदैवं कुटुंबकम ही आपल्या संतांची शिकवण, परंपरा आहे.
एकीकडे तुम्ही संस्कृतीचे गोडवे गात असताना दुसरीकडे वसदैवं कुटुंबकमला तिलांजली देता.
असं म्हणत अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी अभिनेता विक्रम गोखलेंना (Vikram Gokhale) प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : MP Amol Kolhe | freedom fighters should not be insulted talking about independence amol kolhe kangana ranaut

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘कायद्याचं राज्य नव्हे, ‘काय ते द्या’चं राज्य’

Dr Amol Kolhe | ‘हॉस्पीटलमधील तुमच्या पेशंटसाठी म्हणाल का, याला भगव्याचच रक्त द्या’; अमोल कोल्हेंचा विक्रम गोखलेंवर निशाणा

Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्र्यांना कुणी मुख्यमंत्री समजतच नाही’ – देवेंद्र फडणवीस

 

Related Posts