IMPIMP

खासदार श्रीनिवास पाटील यांची संरक्षणमंत्र्याकडे मागणी, म्हणाले – ‘सैन्यभरतीची वयोमर्यादा त्वरीत वाढवा’

by pranjalishirish
MP Shriniwas Patil 's demand to the Defense Minister, said - 'Raise the age limit for recruitment immediately'

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – या वर्षी सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्याकडे केली आहे. कोरोनामुळं जी परिस्थिती ओढवली आहे त्यामुळं सातारा जिल्ह्यासह इतर ठिकाणची सैनिक भरतीही रखडली आहे. त्यामुळं काहींची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. त्यामुळं काहींची संधी हिरावली जाऊ नये यासाठी भारत सरकारनं खास बाब म्हणून यावर्षी सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

अधिकारी बनलेल्या उमेदवारांचा राज्य सरकारला  सवाल, … मग नियुक्त्या का थांबल्या?

श्रीनिवाल पाटील Shriniwas Patil यांनी संबंधितांना प्रत्यक्ष भेटून याबाबत मागणी केली आहे. पाटील सध्या लोकसभा अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहेत. कोरोनाचा गंभीर परिणाम भरतीवर झाला आहे. वर्षभरापासून सैनिक भरती रखडली आहे. भरतीसाठी तरुण प्रचंड मेहनत घेत असतात.

सिंधीया यांच्या ज्या ‘जय विलास’ राजवाड्यात झाली चोरी, तिथं आहेत 400 खोल्या आणि 3500 KG चे झुंबर

सैन्यभरती प्रक्रिया वारंवार स्थगित होताना दिसत आहे. त्यामुळं यासाठी मेहनत घेणाऱ्या तरुणांची संधीही हुकत आहे. कोल्हापूर येथे होणारी भरती पुन्हा काही काळ स्थगित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी हजारो तरुणांची संधी हुकण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनानं वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भरती आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळं आता ही भरती आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. अशात सध्या इच्छुक तरुणांची वयोमर्यादा संपू शकते. त्यामुळं ही वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी केली जात आहे.

Also Read :

Sachin Vaze Case : देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशीरा घेतली PM मोदी अन् HM अमित शाह यांची भेट

Sachin Vaze Case : महाविकास आघाडीच्या एक-दोन मंत्र्यांची NIA कडून चौकशी होण्याची शक्यता

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी 

Related Posts