IMPIMP

MP Supriya Sule । ‘पुण्याच्या महापौरांना कारभार झेपत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा’

by bali123
mp supriya sule on pune municipal corporation mayor murlidhar mohol pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन MP Supriya Sule  | पुण्यातील दांडेकर पुलालगत (Dandekar Pool) आंबिल ओढ्या परिसरात पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली. अनेक घरे जमीन दोस्त झाली. स्थानिक जोरदार आक्रमक झाल्याने तेथील परिस्थिती चिघळली होती. या विषयावरून राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांच्यावर चांगल्याच कडाडल्या आहेत. ‘पुण्याच्या महापौरांना कारभार झेपत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे सुप्रिया सुळे यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांना सुनावलं आहे. तर पुण्यातील आंबिल ओढ्यावरील कारवाईबाबत चौकशी मागणी देखील खा. सुळेंनी (Supriya Sule) केली आहे. mp supriya sule on pune municipal corporation mayor murlidhar mohol pune

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुण्यात माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, आंबिल ओढ्यावर कारवाई कोणी केली, हे सर्वांना माहित आहे. पुणे महानगरपालिकेत भाजपची (BJP) सत्ता असून त्यांनीच ही कारवाई केली आहे. या घटनेची चौकशी व्हावी. तसेच महापौरांनी याप्रकरणी उत्तर द्यावं. आणि हे सर्व झेपत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असं त्यांनी म्हटलं आहे.

देशात पहिल्यांदाच अशाप्रकारे यंत्रणांचा गैरवापर..

खा. सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईबाबत बोलताना म्हणाल्या, ‘राजकारण हे विचारांचं असतं. ते लोकांसाठी करायचं असतं. आजपर्यंत विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी याअगोदरही कधीही तपास यंत्रणांचा वापर केला नव्हता. परंतु, देशात पहिल्यांदाच अशाप्रकारे यंत्रणांचा गैरवापर होताना आपण पाहात आहोत,” असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशात कोरोनाची परिस्थिती असताना सरकारकडून अशाप्रकारे सुडाचं राजकारण जाते.
जे पूर्णपणे चुकीचं आहे. आमचं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे.
आम्ही लोकांची सेवा करण्यात व्यस्त आहोत. कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर काय तयारी करता येईल,
याबाबतची चर्चा आज केली जाणार आहे.
तिसरी लाट रोखण्यासाठी महाविकास आघाडी अनेक नियोजन करत असल्याचं खा. सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं आहे.

Web Title :- mp supriya sule on pune municipal corporation mayor murlidhar mohol pune

Related Posts