IMPIMP

Nagar : ‘महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहू, आता राष्ट्रवादीचा पाठिंबा नको’ – भाजपचे पदाधिकारी

by omkar
Devendra fadnavis govt was responsible for koregaon bhima riots says sharad pawar

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन – महापौर निवडणुकीच्या (Mayor election) पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 2) शहर भाजपचे पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी महापौरपदाच्या निवडणुकीत (Mayor election) कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देता तटस्थ राहावे, असे सांगून महापौर पदासाठी आता फरपट नकोच, अशा शब्दात भाजप पदाधिकारी, नगरसेवकांनी भावना व्यक्त केल्या.

दरम्यान नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली. पक्ष जो आदेश देईल, तो सर्वांना मान्य राहील. पक्षाने महापौर निवडणुकीबाबत (Mayor election) निर्णय घ्यावा, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले असल्याचे समजते.

‘सीरम’ने मागितली कायदेशीर कारवाईतून सूट, म्हटले – ‘सर्वांसाठी असावा एकच नियम’

विळदघाट येथे झालेल्या बैठकीला शहरातील भाजप नगरसेवकांसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार विखे यांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली पदाधिकाऱ्यांनी भाजपकडे महापौर पदासाठी उमेदवार नाही.
तसेच सत्ता स्थापनेसाठी पुरसे संख्याबळ नाही गेली अडीच वर्षे राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने महापालिकेत भाजपची सत्ता आली.

सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला.
त्यामुळे भाजपाला महापौर आणि उपमहापौर पद मिळाले; परंतु यापुढे कुणाच्याही मागे फरपटत न जाता तटस्थ राहावे, अशी भावना पदाधिकाऱ्यांची व्यक्त केली.
भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांची मते जाणून घेतल्यानंतर वस्तुस्थिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली जाईल यापुढे सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय होतील.
आपण स्वत: शहरात लक्ष घालणार असून, प्रभागनिहाय बैठका घेऊन प्रश्न सोडविणार असल्याचे अश्वासन खासदार विखे यांनी यावेळी दिले.

पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्यः जिल्हाध्यक्ष गंधे

महापौर निवडणुकीबाबत पदाधिकारी व नगरसेवकांची मते जाणून घेण्यासाठी बैठक झाली. सर्वांनी आपले मत व्यक्त केले असून, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. पक्षाने घेतलेला निर्णय सर्वांना मान्य राहणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्य़क्ष भैया गंधे यांनी सांगितले.

Also Read:- 

’तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल’…म्हणत माजी आमदाराच्या सुनेवर तुटून पडली मुलगी

मंगलदास बांदल यांच्याविरूध्द आणखी एक फसवणूकीचा गुन्हा, इतरांचा देखील समावेश

50000 ची लाच घेताना उत्पादन शुल्कच्या निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, जाणून घ्या

Coronavirus : अमेरिकन ‘महामारी’ तज्ज्ञ अँथनी फाउची आणि बिल गेट्स यांच्यावर संशय ! चीनी शास्त्रज्ञा सोबत चर्चा? ईमेल ‘लीक’

मुंबईच्या दहिसर पूर्वमध्ये प्रियकराच्या मदतीनं तिनं केली नवर्‍याची हत्या, स्वयंपाक घरात पुरलेल्या मृतदेहाचं ‘गौडबंगाल’ 6 वर्षाच्या मुलीनं सांगितलं (Affair)(Affair)(Affair)

Kadha In Summer : उन्हाळयात काढा पिण्याने नुकसान होऊ शकते का? जाणून घ्या

दोनशे जणांची 7.14 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ‘आदर्शनागरी’ च्या अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक

Related Posts