IMPIMP

Nagpur ZP Election | देवेंद्र फडणवीस अन् नितीन गडकरींच्या जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का ! काँग्रेसचं वर्चस्व, 9 जागांवर दणदणीत विजय

by nagesh
Nitin Gadkari | nagpur bjp leader nitin gadkari slams vijay wadettiwar says devendra fadnavis is like my younger brother

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन –  Nagpur ZP Election | नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मंगळवारी (5 ऑक्टोबर) रोजी मतदान झाले. आज (बुधवारी) निवडणुकीचा निकाल (Nagpur ZP Election) सुरु होता. नागपूर याठिकाणी सर्व जागेचे निकाल हाती आलेत. यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे केंद्रिय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जिल्ह्यात भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. त्याठिकाणी काॅग्रेसनं आपलं वर्चस्व राखलं आहे.

नागपुर जिल्ह्यात काॅग्रेस (Congress) पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या 16 आणि काॅग्रेसच्या 9 जागेवर काॅग्रेसने विजय मिळवला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेत भाजपला (BJP) फक्त 3 जागेवरच समाधान मानावे लागले. नागपूर जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र त्याठिकाणीच भाजपला हार पत्कारावी लागली आहे. (Nagpur ZP Election)

दरम्यान, काँग्रेसच्या सुनील केदार (Sunil Kedar) यांचं वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आल्याची चर्चा आहे. तर, भाजपचं मागील निवडणुकीच्या तुलनेत एका जागेचं नुकसान झालं आहे. मागील निवडणुकीत भाजपने 4 जागेवर विजय मिळवला होता. मात्र, आता केवळ 3 जागेवर विजय मिळवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला एक दणका बसला आहे.

नागपूर जिल्हा परिषद अंतिम निकाल – एकूण जागा – 16

भाजप- 3

शिवसेना- 0

राष्ट्रवादी- 2

काँग्रेस- 9

शेकप – 1

गोंडवाना गणतंत्र पार्टी- 1

इतर- 0

 

Web Title : Nagpur ZP Election | Big blow to BJP in Devendra Fadnavis and Nitin Gadkari’s district! Congress dominated BJP, congress won 9 seats

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अंगावर वीज पडून 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना

FB-WhatsApp Technical Error | FB-WhatsApp पुन्हा ‘गंडलं’ तर? जाणून घ्या ‘हे’ 5 सर्वोत्तम पर्याय अन् राहा जागाच्या संपर्कात

Gold Price Today | खुशखबर ! सणापूर्वी कमी झाला सोन्याचा दर, सर्वोच्च स्तरापासून मिळतंय 10582 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या नवीन दर

 

Related Posts