IMPIMP

‘शिवसेना-राष्ट्रवादी’च्या भूमिकेवर नाना पटोले भडकले !

by nagesh
nana patole got angry over the role of shiv sena ncp assembly speaker election

सरकारसत्ता ऑनलाइन – विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आग्रही भूमिका मांडत आहे. आज काँग्रेस नेत्यांची विधानभवनात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) शिवसेना (ShivSena) आणि राष्ट्रवादीच्या (Nationalist Congress Party – NCP) भूमिकेवर भडकल्याची माहिती आहे.

विधानभवनात काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बैठक पार पडली. यात काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत, कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांच्यासह इतर आमदार उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) चांगलेच संतापले होते. त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीनं केलेल्या विधानावर पटोलेंनी (Nana Patole) नाराजी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी अशी आग्रही भूमिका काँग्रेसनं केली, परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी यासाठी अनुकूल नसल्यानं पटोलेंनी नाराजी व्यक्त केल्याचं समजत आहे.

अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नसल्याची माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं दिली आहे. अध्यक्ष पदाच्या निवडीच्या प्रक्रियेसाठी किमान 3 दिवस लागतात. ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरायचा असतो, त्याच्या आदल्या दिवशी तशी घोषणा करावी लागते. दुसऱ्या दिवशी अर्ज भरला जातो आणि तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष निवडणूक होत असते. आज आणि उद्या असे दोन दिवस अधिवेशनाचे शिल्लक आहेत. त्यामुळं आता ही निवडणूक होणार नाही अशी माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं दिली आहे.

‘सासरी पत्नीला झालेल्या प्रत्येक दुखापतीसाठी पतीच जबाबदार’ : सुप्रीम कोर्ट
औरंगाबाद नामांतराबाबत मुख्यमंत्र्यांनी हात झटकले; म्हणाले…
मनसुख हिरेन यांची हत्या करून मृतदेह खाडीत फेकून दिला…

Related Posts