IMPIMP

Narayan Rane | राणेंच्या अटकेचा आदेश नेमका कुणी दिला? CM ठाकरे, अजित पवार, आणि अनिल परब?

by nagesh
Narayan Rane | who ordered arrest of narayan rane read the inside story behind arrest

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून राणेंवर गुन्हा दाखल झाला. यांनतर राणेंना कालच रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर येथून अटक केले. त्यांनतर रात्री उशिरापर्यंत महाड कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र काल संपूर्ण झालेल्या नाट्य घडामोडीनंतर या अटकेमागची कहाणी समोर आलीय. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) अटक करण्याचा निर्णय हा सोमवारीच झाला असल्याचं समोर आलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला.
मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जपण्यासाठी तसेच यापुढे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अशाप्रकारचं कुणीही वक्तव्य करु नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं समजत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यात चर्चा झाली आणि त्यानंतर नारायण राणेंना अटक करण्याचा निर्णय झाला.
त्यानंतर काल (मंगळवारी) नारायण राणे यांना अटक करण्यात आली.
असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मागील दीड वर्षांत जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) सत्तेत आल्यापासून भाजपचे सर्वात मोठं टार्गेट म्हणजे उद्धव ठाकरे राहिले आहेत.
दरम्यान आता नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) आणखीनच जोरदार घणाघात करण्यास सुरुवात झाली आहे.
आगामी निवडणुका लक्षात घेता नारायण राणेंच्या अटकेची ही रणनिती आखली गेली असल्याचं देखील म्हटलं जात आहे.

दरम्यान, नारायण राणेंना महाड कोर्टाकडून (Mahad Court) दिलासा मिळाला असला तरी राणेंच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
कारण राणेंवर महाड, नाशिक आणि पुणे येथे गुन्हा दाखल झाला आहे.
काल महाड कोर्टाने जामीन (Bail) मंजूर केला असला तरी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) नोटीस बजावली असल्याचे समजते.
यावरून आता नारायण राणेंना पोलीस कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
नाशिकमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या बाबत जबाब घेण्यासाठी पोलिसांनी ही नोटीस दिली आहे.
दरम्यान, राणेंना 2 सप्टेंबर रोजी पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितलं आहे.

 

Web Title : Narayan Rane | who ordered arrest of narayan rane read the inside story behind arrest

 

हे देखील वाचा :

Court News | लैंगिक संबंध ठेवले म्हणून लग्न करणं बंधनकारक नाही; न्यायालय म्हणाले…

Pune Crime | पुण्यातील पोलीस ठाण्यात फिनाईल पिऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

Burglary in Pune | पुण्यात चोरट्यांचा धूमाकूळ, वारजे माळवाडीत 14 लाखांची घरफोडी

 

Related Posts