IMPIMP

Court News | लैंगिक संबंध ठेवले म्हणून लग्न करणं बंधनकारक नाही; न्यायालय म्हणाले…

by nagesh
Pune Crime | BMW worth Rs 66 lakh bought with embezzlement money! The money was diverted from a foreign bank account to his own account

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Court News | मुंबई सत्र न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्वाळा केला आहे. यामध्ये 2 व्यक्ती केवळ लैंगिकदृष्ट्या एकमेकांत गुंतल्या म्हणून त्यांनी एकमेकांशी विवाह (Marriage) करणे बंधनकारक नाही, असं निरीक्षण नोंदवत न्यायालयाकडून बलात्काराचा आरोप असलेल्या तिघांचा अटकपूर्व जामीन (Bail) मंजूर करण्यात (Court News) आला आहे. विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार (Rape) केल्याची तक्रार (Complaint) एका महिलेनं केली आहे.

अधिक माहिती अशी, तक्रारदार महिलेचे एका आरोपीवर प्रेम होते. आरोपीने तिच्याशी विवाह केला नाही. त्याने विवाहाचे आमिष दाखवून तिच्याकडून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सहमती घेतली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला. अटक होईल या भीतीने आरोपींनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. दरम्यान, यावरून अतिरिक्त सत्र न्यायालयाचे (Additional Sessions Court) न्यायाधीश पी. एम. गुप्ता (Judge P. M. Gupta) यांनी निर्वाळा दिला आहे. न्या. गुप्ता यांनी म्हटल की, कोणाशी लग्न करणे ही निवडीची बाब आहे. ती कोणावरही लादली जाऊ शकत नाही. केवळ 2 व्यक्तींनी एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवले म्हणून त्यांनी लग्न करणे बंधनकारक नाही, असं निरीक्षण न्या. गुप्ता (Judge P. M. Gupta) यांनी नोंदवलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 दरम्यान, न्यायालयाने (Court) सांगितलं की, ‘तक्रारदार ही सज्ञान आहे. सुशिक्षित आहे. त्यामुळे विवाहापूर्वी शारीरिक संबंध (Physical contact) ठेवण्याचे परिणाम काय होऊ शकतात, याची जाणीव तिला आहे. आपली फसवणूक करून सहमती घेण्यात आल्याचे महिलेचे म्हणणे आहे. मात्र, तसे दर्शविणारे पुरावे नाहीत, असं कोर्टानं म्हटलं आहे. आरोपीच्या जामीन (Bail) अर्जावरून न्यायालयानं सांगितलं आहे की, 2019 मध्ये गुन्हा नोंदवेपर्यंत महिलेने आरोपीबरोबर अनेक ठिकाणी भेट दिली व त्याच्याबरोबर राहिलीही. तक्रार केल्यानंतरही ती आरोपीबरोबर अनेक ठिकाणी गेली व ठाण्यातील अनेक हॉटेल्समध्ये त्याच्याबरोबर राहिली.

दरम्यान, पुढं न्यायालयानं म्हटलं आहे, की सदर प्रकरणातील वस्तुस्थिती लक्षात घेता आरोपीचे
तक्रारदार महिलेबरोबर प्रेमसंबंध होते. त्यांनी एकमेकांबरोबर शारीरिक संबंध ठेवले आणि काही
कारणास्तव त्यांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. त्यांच्यात असलेले शारीरिक संबंध हे एकमेकांच्या सहमतीनेच होते, हे निश्चित. असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.

 

Web Title : court news marriage not binding having physical relation pre arrest bail rape accused

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील पोलीस ठाण्यात फिनाईल पिऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

Burglary in Pune | पुण्यात चोरट्यांचा धूमाकूळ, वारजे माळवाडीत 14 लाखांची घरफोडी

Mumbai Crime | अल्पवयीन विद्यार्थिनीला पॉर्न दाखवून केलं मास्टरबेट, शिक्षक ‘गोत्यात’

 

Related Posts