IMPIMP

Burglary in Pune | पुण्यात चोरट्यांचा धूमाकूळ, वारजे माळवाडीत 14 लाखांची घरफोडी

by nagesh
Burglary Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन कोरोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल होताच पुण्यात गुन्ह्यामध्ये (Burglary in Pune) वाढ होताना पहायला मिळत आहे. बाणेरमध्ये (Baner) दिवसाढवळ्या घरफोडी (burglary in house) करुन लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. तर हडपसर (Hadapsar) परिसरात चोरट्यांनी घरफोडी करुन 88 लाखाचा ऐवज चोरुन नेला होता.. पुण्यातील (Burglary in Pune) या घटना ताज्या असतानाच चोरट्यांनी वारजे माळवाडी (Warje Malwadi) परिसरातील एका घरात दिवसाढवळ्या घरफोडी करुन 14 लाखाचा ऐवज चोरुन नेला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या (Warje Malwadi Police Station) हद्दीतील शांती संकुल दिगंबरवाडी शाळेजवळ राहणारे जेठाराम धनाराम
जोशी (वय-48) हे मंगळवारी (दि.24) सकाळी 11.15 वाजता घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या घराचे
कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटातील सोन्याचे दागिने, चांदिचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 13 लाख 70 हजार 050
रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

जोशी हे दुपारी साडेतीन वाजता घरी आले असता त्यांना घराचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. त्यांनी
घरात जाऊ पाहिले असता घरातील समान असताव्यस्त पडल्याचे दिसून आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच जोशी यांनी वारजे माळवाडी पोलीस
ठाण्यात धाव घेत चोरी झाल्याची तक्रार दिली. जोशी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास
वारजे माळवाडी पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Thieves rampant in Pune, burglary of Rs 14 lakh in Warje Malwadi

हे देखील वाचा :

Mumbai Crime | अल्पवयीन विद्यार्थिनीला पॉर्न दाखवून केलं मास्टरबेट, शिक्षक ‘गोत्यात’

Property Card | आता घरबसल्याच मिळणार डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

Nanded News | 2 महिला शेतातून काम करून घरी परतत असताना काळानं घातला घाला

 

Related Posts