IMPIMP

Nashik Lok Sabha Election 2024 | …तर नाशिकमधून भुजबळांच्या विरोधात मराठा उमेदवार लढणार, मनोज जरांगेंना पाठवला अहवाल

by sachinsitapure

नाशिक : Nashik Lok Sabha Election 2024 | नाशिकच्या जागेवर सध्या महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) दोन्हीकडून उमेदवार ठरलेला नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या उमेदवारीसाठी शिंदे गट (Eknath Shinde Group) आक्रमक झाला आहे. तसेच अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचेही नाव चर्चेत आहे. परंतु, भुजबळ यांना उमेदवारी मिळाल्यास सकल मराठा समाज (Sakal Maratha Samaj) येथे आपला अपक्ष उमेदवार देणार आहे.

मराठा आरक्षणाला विरोध करत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation Andolan) नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यावर वेळोवेळी जहरी आणि अवमानकारक टीका केली होती. त्याचा वचपा आता काढण्यासाठी सकल मराठा समाज सरसावल्याचे दिसत आहे.

सकल मराठा समाजाने नाशिकच्या नांदूरनाका परिसरातील शेवंता लॉन्समध्ये निवडणुकीसंबंधी बैठक घेतली. या बैठकीत नाशिक मतदारसंघातून भुजबळ किंवा त्यांचा पुतण्या उमेदवार असल्यास, सकल मराठा समाजही मराठा उमेदवार मैदानात उतरवणार आहे, असा निर्णयच घेण्यात आला.

या बैठकीचा सकल मराठा समाजाने मनोज जरांगे यांना पाठवला आहे. तसेच मराठा उमेदवाराची चाचपणीही सुरू केली आहे. त्यामुळे, नाशिकमध्ये भुजबळ यांना नाशिकमधील उमेदवारी सोपी असणार नाही.

Pune Katraj Crime | पुणे : भररस्त्यात तरुणीची छेड काढून आईला मारहाण, तिघांवर FIR

Related Posts