IMPIMP

Maharashtra : राष्ट्रपती राजवट अशक्य ! महाविकास आघाडीच्या ‘या’ नेत्याचे वक्तव्य

by bali123
mahavikas

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. विरोधक महाविकास आघाडी ( mahavikas ) सरकारला घेरण्याची एकही संधी सोडत नाहीत. महाविकास आघाडीवर टीका करताना विरोधकांकडून राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीच्या कामावर समाधानी असल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावणे अशक्य आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हणले आहे.

महाविकास आघाडीच्या सुरुवातीच्या काळात सरकार टिकणार नाही, फाटाफूट होऊन भाजपची सत्ता येईल, असा दावा भाजप खासदार नारायण राणे यांच्याकडून करण्यात आला होता. या गोष्टीला १५ महिने उलटल्यानंतर त्यांनी हा बाजा वाजवणे बंद केले. त्यानंतर आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहेत. कारण याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. पण त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करणे अशक्य आहे. कोणत्याही राज्यात अशीच कुणालाही राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

सत्य लवकरच समोर येईल
अपक्ष खासदार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये बऱ्याच लोकांची नावे आहेत, त्यामध्ये भाजप नेत्यांचासुद्धा समावेश आहे. हा तपास रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव आणला जाऊ नये. यंत्रणांना त्यांचे काम करू दिले पाहिजे. तसेच मनसुख हिरेन प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल. जोपर्यंत हे सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत कोण काय म्हणतंय, यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आले आहे.

मनसुख हिरेन यांचा मृत्यू जसा संशयास्पद आहे, तशीच या संपूर्ण प्रकरणात राज्य सरकारची भूमिकासुद्धा संशयास्पद आहे. राज्य सरकारच्या अनास्थेमुळे मराठा आरक्षणाचा घोळ झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. तसेच वाढीव वीजबिलांमुळे सामान्य वीजग्राहक त्रासला आहे. आता या मुद्यांवर जनजागृती करण्यासाठी भाजपच्या २० हजार शक्ती केंद्रांतर्फे २० हजार सभा, बैठका घेण्यात येतील, असे चंद्रकांत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले होते.

Related Posts