IMPIMP

‘अब तो एक ढुंढो हजार मिलते है…’ नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर ‘प्रहार’

by bali123
Shivsena Vs Narayan Rane | shivsena chandrakant khaire slams narayan rane targeting uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजप नेते आणि खासदार नारायण राणे ( narayan rane ) यांचे नाव न घेता टीका केली. मुख्यमंत्र्यांनी मेडिकल कॉलेजच्या मुद्यावरून नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला नारायण राणे यांनी पलटवार करत खोचक टीका केली आहे. नारायण राणे यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाचा आधार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

नारायण राणे यांनी त्यांच्या दैनिक ‘प्रहार’मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा किस्सा छापला आहे. यामध्ये नारायण राणे यांनी म्हटले आहे की, बाळासाहेब, आपण व्यंगचित्र करण्याचे काम कमी केलेत. या प्रश्नाला उत्तर देताना बाळासाहेबांनी खंत व्यक्त केली होती. व्यंगचित्र काढण्यासारखे चेहरे राहिले नाहीत. त्या उंचीचे व्यक्तिमत्त्व नजरेस पडत नाही. दर्जेदार विषय गवसत नाहीत. विकृत आणि विदूषक कमी केले. आज बाळासाहेब असते तर उत्स्फूर्तपणे कुंचला उचलला असता अन् दिवसागणिक शेकडो व्यंगचित्रं केली असती. ‘अब तो एक ढुंढो हजार मिलते है, और तो घर मे ही दो दो बसते है’, असे म्हणत राणे यांनी खोचक टीका केली आहे.

यासोबत बाळासाहेब ठाकरे यांचा व्यंगचित्र काढतानाचा फोटो छापण्यात आला आहे. त्यावर ‘अब तो एक ढुंढो हजार मिलते है’, असे लिहिण्यात आले आहे. या फोटोला ‘आज बाळासाहेब असते तर…’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. आणि सर्वांत शेवटी ‘खा. नारायण राणे यांच्या संग्रहातून’ असे म्हटले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाइन उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, मेडिकल कॉलेजची घोषणा आजही मी करू शकतो. मात्र, मला खोटे बोलता येत नाही. कोकणात कॉलेज करायचे हे माझ्या लक्षात आहे. हे काम करू शकतो की नाही, याची खात्री होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला शब्द देणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना टोला लगावला.

नारायण राणेंचा पलटवार
नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहे. सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी, अशा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.

Related Posts