IMPIMP

Nilofer Malik | अमृता फडणवीसांच्या ‘बिगडे नवाब’ ट्विटला नवाब मलिकांची मुलगी निलोफरनं दिलं उत्तर, म्हणाल्या…

by nagesh
Nilofer Malik | over allegation nilofer malik replys to amruta fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सध्या ड्रग्स (Drugs) आणि अंडरवर्ल्ड (Underworld) संबंधावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मलिक यांना ‘बिगडे नबाव’ म्हटलं. त्यांच्या ट्विटला मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक (Nilofer Malik) यांनी उत्तर दिलं आहे. निलोफर मलिक (Nilofer Malik) यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

काय म्हटले अमृता फडणवीसांनी?

 

काल अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना ‘बिगडे नवाब’ म्हटलं. प्रत्येकवेळी पत्रकार परिषद घेऊन खोट्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. काळी कमाई आणि जावयाला वाचवणं एवढच यांचं लक्ष्य आहे, अशी टीका त्यांनी केली.

 

 

निलोफर मलिक यांचे प्रत्युत्तर

 

अमृता फडणवीस याच्या टीकेला प्रत्युत्तर देताना निलोफर मलिक (Nilofer Malik) म्हणाल्या, कापाट मध्ये लपवलेले सांगाडे (skeletons) नसतील, तर त्यांना पत्रकार परिषदेची चिंता वाटणार नाही. जेव्हा तुमची सत्याची बाजू असते, तेव्हा क्वचितच तुम्हाला भीती वाटते. त्यांचा द्वेषपूर्ण हेतू (malicious intentions) असेल, तर ते उघडे पडतील. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हाच आमचा ध्यास आहे, असं निलोफर मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

 

दरम्यान नवाब मलिक यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी ड्रग्सशी संबंधीत असलेल्या एका व्यक्तीसोबत उभ्या असलेल्या अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर करत त्यांच्यावर आरोप केले होते. तेव्हा अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Web Title : Nilofer Malik | over allegation nilofer malik replys to amruta fadnavis

 

हे देखील वाचा :

Nawab Malik | नवाब मलिकांचे अमृता फडणवीसांना उत्तर; म्हणाले – ‘वरळी इथं 200 कोटींचा फ्लॅट कुणाचा आहे?’

Pune Crime | वाळू व्यावसायिक संतोष जगतापच्या बॉडीगार्डचा उपचारादरम्यान मृत्यू

Earn Money | खुशखबर ! RBI देतय 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, तात्काळ जाणून घ्या काय करावे लागेल?

 

Related Posts