IMPIMP

एकेकाळी केलं राम मंदिराच्या आंदोलनाचं नेतृत्व; विश्व हिंदू परिषदेच्या ज्येष्ठ नेत्याच्या भावाकडून 11 कोटींची देणगी !

by sikandershaikh
modi-singhal

उदयपूर : वृत्तसंस्थाविश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल (ashok singhal) यांचे लहान भाऊ अरविंद सिंघल यांनी अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. राजस्थानमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे.

अरविंद सिंघल म्हणाले, मोठ्या भावाचं राम मंदिराचं स्वप्न पूर्ण होत आहे. याचा मला आनंद आहे. विश्व हिंदू परिषदेनं केलेल्या राम मंदिर आंदोलनात अशोक सिंघल यांची मोठी भूमिका होती. राम मंदिर उभारणीसाठी त्यांनी अनेक आंदोलनांचं नेतृत्व केलं होतं.

राम मंदिराच्या उभारणीसाठी उदयपूरमध्ये देणगी जमा करणाऱ्या पारस सिंघवी यांच्याकडे अरविंद सिंघल यांनी दोन वेळा चेकच्या माध्यमातून 11 कोटी रुपयांचा निधी दिला. पहिल्या टप्प्यात 5 कोटी आणि नंतर 6 कोटी रुपयांचा चेक त्यांनी दिला. सिंघवी यांनी असंही सांगितलं की, सिंघल कुटुंबाकडून देण्यात आलेली देणगी आतापर्यंत राज्यातील सर्वात मोठी देणगी आहे.

मंदिराच्या भूमी पूजनादरम्यान पंतप्रधानांसोबत सिंघलदेखील उपस्थित होते

सिंघल कुटुंब राजस्थानातील उदयपूर भागात राहतं.
अयोध्येत राम मंदिराच्या भूमी पूजनादरम्यान सिंघल कुटुंबातील सदस्य सलिल सिंघल उपस्थित होते.
अशोक सिंघल यांनी राम मंदिरासाठी आंदोलन पुकारलं होतं. ते पाहता राम मंदिर ट्र्स्टनं या कुटुंबाला आमंत्रण पाठवलं होतं.
त्यावेळी अरविंद सिंघल आजारी असल्यानं त्यांनी सलिल यांना पाठवलं होतं.

खाण आणि विद्युत उकरणांचा व्यवसाय

अरविंद सिंघल (ashok singhal) हे राजस्थानातील मोठे उद्योगपती आहेत.
ते व्हॉल्कन इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
खाण क्षेत्राव्यतिरीक्त त्यांची कंपनी विद्युत उपकरणंही तयार करते.

Related Posts