IMPIMP

पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर ! 17 एप्रिलला होणार मतदान, राष्ट्रवादीकडून कोणाला संधी?

by pranjalishirish
Sharad Pawar | sharad pawar hits out modi government after three farm laws repealed pm narendra modi

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन-  राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके Bharat Bhalke यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी 17 एप्रिल रोजी मतदान election तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी अनेक जाणांनी तयारी केली आहे. प्रत्येक पक्षाचे निवडणूक आयोग कधी तारीख जाहीर करते याकडे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी (दि.16) आयोगाना तारीख जाहीर केली.

23 मार्च पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. 30 मार्च ला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 3 एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.  प्रत्यक्ष मतदान election 17 एप्रिल रोजी होणार आहे. तर मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केल्यामुळे आचार संहिता लागू झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

राष्ट्रवादीकडून कोण-कोण स्पर्धेत ?

भारत भालके Bharat Bhalke यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून अनेकजण इच्छूक आहेत. संभाव्य उमेदवरांमध्ये काही दिवसांपासून उमेश परिचारक, दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व अवताडे समुहाचे सर्वेसर्वा समाधान आवताडे, शिवसेना महिला नेत्या शैला गोडसे, डी.व्ही.पी. उद्योग समूहाचे अभिजीत पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

दरम्यान, शरद पवार या जागेवर राष्ट्रवादीची उमेदवारी नेमकी कोणाला देणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे सध्यातरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असून लवकरच पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

Also Read :

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

Related Posts