IMPIMP

मोठी बातमी ! पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, आवताडेंच्या अडचणी वाढणार?

by pranjalishirish
pandharpur assembly constituency by election set back for bjp candidate samadhan avtade

पंढरपूर : पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक येत्या काही दिवसांत होत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपने कंबर कसली आहे. भाजपकडून BJP समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण आता त्यांच्या घरातून फूट पडल्याचे दिसत आहे. समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शिवसेनेकडून भाजपला टोला, म्हणाले – ‘किमान, व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ही जागा रिक्त होती. मात्र, आता या जागेसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून BJP समाधान आवताडे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. ही जागा यापूर्वी राष्ट्रवादीकडे असल्याने आता याकडे राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष दिल्याचे दिसत आहे. मात्र, समाधान आवताडे यांच्या घरात उभी फूट पडल्याचे दिसत आहे. सिद्धेश्वर आवताडे हेही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

अनेक ख्यातनाम विचारवंताचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठबळ, म्हणाले…

दरम्यान, आत्तापर्यंत राष्ट्रवादीचे भगिरथ भालके आणि भाजपचे BJP समाधान आवताडे या दोघांमध्ये प्रमुख लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, आता सिद्धेश्वर आवताडे यांच्या उमेदवारीमुळे भाजपला मोठा धक्का बसला असून, हे चित्र बदलणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’

माजी उपमुख्यमंत्र्यांचे प्रयत्न निष्फळ

सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने समाधान आवताडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सिद्धेश्वर आवताडेंची समजूत काढण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रयत्न केले होते. मात्र, ते प्रयत्न निष्फळ ठरले.

Also Read : 

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

अबू आझमींचा इशारा, म्हणाले -‘आम्ही सरकारसोबत,पण जनहितासाठी आंदोलन करु’

दुर्दैवी ! ‘कोरोना’मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून नुकतेच सन्मानित झालेले जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कठोर निर्बंध लावणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

पत्नी रूग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय, तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, टिका करणं सोपं पण…’

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

Related Posts