IMPIMP

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

by pranjalishirish
pandharpur Bhagirath Bhalke is assembly election by poll candidate

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन –  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देताना जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला जाईल. उमेदवाराची घोषणा पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे करतील, असे सांगत भगिरथ भालके  Bhagirath Bhalke हेच उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

राज ठाकरे यांनी केलेल्या ‘त्या’ मागणीला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा

पंढरपूर येथील कोर्टी रोडवरील श्रेयस पॅलेस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक रविवारी (दि.21) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलताना त्यांनी भगिरथ भालके Bhagirath Bhalke यांना उमेदवारी देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

दिलीप वळसे-पाटील होऊ शकतात नवे गृहमंत्री ! HM अनिल देशमुख यांना दिला जाऊ शकतो ‘निरोप’

यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, दीपकआबा साळुंखे-पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाकार्याध्यक्ष उमेश पाटील, विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके Bhagirath Bhalke यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अजित पवार उठले असता उपस्थित कार्यकर्त्यांनी भगिरथ भालके यांच्या नावाची घोषणा देण्यास सुरुवात केली.

शरद पवारांचा दिल्लीतून भाजपवर ‘निशाणा’, फडणवीसांनी केला ‘पलटवार’

कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरु असताना अजित पवार यांनी त्यांना शांत बसण्याचे आवाहन करत तुमच्या मनातीलच उमेदवार पक्षाकडून दिला जाईल. पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी तुमची असेल. याशिवाय विरोधकांचे डिपॉझिट जप्त करण्याची कामगिरी तुम्हाला करायची असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

शरद पवारांनी ‘लेटर बॉम्ब’च्या ‘त्या’ कनेक्शन कडे वेधले लक्ष, म्हणाले…

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मते जाणून घेतल्यानंतर असे लक्षात आले की, तुम्ही जो विचार करतायं, तोच उमेदवार देण्यात यावा, असा निरोप पक्षाध्यक्ष शरद पवार यांना कळवण्यात येणार आहे. तेच उमेदवार जाहीर करतील. मात्र, पक्ष जो उमेदवार देईल, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्यावर असेल. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मागे जे झाले, ते गट तट विसरुन एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

Also Read : 

खा. संजय राऊतांचा सरकारला सल्ला, म्हणाले -‘सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं’

‘तलाश नए रास्तों की है…’ खा. संजय राऊतांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर सिंग यांचे पत्र – जयंत पाटील

Related Posts