IMPIMP

Pandharpur : राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरूध्द बंडखोरी करणार्‍या शिवसेनेच्या शैला गोडसे यांच्यावर CM ठाकरेंच्या आदेशाने कारवाई

by pranjalishirish
pandharpur by election 2021 shiv sena suspended shaila godse for rebelling against ncp candidate

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन- राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भारत भालके यांना, तर भाजपकडून समाधान अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र मित्र पक्षातील नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढत आहे. शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक शैला गोडसे  Shaila Godse यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिल्याने शिवसेनेने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेतून निलंबित केले आहे.

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

शैला गोडसे  Shaila Godse या मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी इच्छुक होत्या. मात्र, मित्र पक्षाने युतीमध्ये उमेदवारी नाकारल्याने त्यांनी निवडणूक लढवली नाही. मात्र, यावेळी त्यांनी पहिल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारी देण्याची मागणी केली होती. परंतु ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याने शरद पवार, अजित पवार तसेच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन उमेदवारी मागितली. परंतु ही जागा भालके कुटुंबाकडेच जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी बंडाचे निशाण फडकवले. त्यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला.

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

शैला गोडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ होणार आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी शैला गोडसे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांच्या दबावामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे शैला गोडसे यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आज सामना या मुखपत्रातून शैला गोडसे यांच्या निलंबनाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्याल्याचे त्यामध्ये नमूद केले आहे.

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

निलंबनविषयी बोलताना शैला गोडसे Shaila Godse  म्हणाल्या, शिवसेना महाविकास आघाडीत समील असल्याने पक्षाची अडचण आपण समजू शकतो, तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे पक्षाच्या कारवाई विरोधात आपण काहीही बोलणार नाही. मात्र, जनतेच्या रेट्यामुळे आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पंढरपूर पोटनिवडणूक आता दुरंगी न होता शैला गोडसे, स्वाभिमानीचे सचिन पाटील व अपक्षांमुळे बहुरंगी होण्याची शक्यता आहे.

Also Read:

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

MPSC परीक्षेतून होणारा भाजपचा प्रचार थांबवा : यशोमती ठाकूर

पवार-शहा भेटीबद्दल प्रफुल्ल पटेल यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, राज्य सरकार स्थिर’

इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा ! न्यायालयानं रद्द केला ‘तो’ खटला

1 एप्रिलपासून कामाचे तास, वेतन बदलणार; जाणून घ्या सरकारचा प्लॅन

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

Related Posts