IMPIMP

Pankaja Munde-Maratha Protesters | केजमध्ये मराठा आंदोलकांनी गाडी आडवली, काळे झेंडे दाखवले, पोलिसांचा सौम्य लाठीमार, पंकजा मुंडे म्हणाल्या ते जरांगेंचे…

by sachinsitapure

बीड : Pankaja Munde-Maratha Protesters | भाजपाच्या बीड लोकसभेच्या उमेदवार (Beed Lok Sabha Election 2024) पंकजा मुंडे केज (Kej Taluka) तालुक्यात आज प्रचार करत असताना काही मराठा आंदोलकांनी (Maratha Andolan) त्यांची गाडी अडवली, तसेच गाडीसमोर काळे झेंडे दाखवत एक मराठा, लाख मराठा घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीहल्ला केला (Police Lathi Charge). यानंतर परिसरात तणावाची स्थिती होती. दरम्यान, या प्रकारावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे यांनी दोन-चार लोक सोडले तर बाकीची मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची माणसे नसावीत, असे म्हटले आहे.

पंकजा मुडे म्हणाल्या, काळे झेंडे दाखवणारे चार-पाच जण होते. त्यांच्याकडे काळे झेंडेदेखील नसल्याने त्यांनी खिशातून रुमाल काढून दाखवले. या भागात इतर नेत्यांनाही असा विरोध होत आहे. हे तरुण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काळे झेंडे दाखवत आहेत. मी पोलिसांना सांगितले की, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका. परंतु, काहींनी तिथे गोंधळ घातला, आरडाओरड सुरू केली.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मला वाटते की, ते रुमाल दाखवणारे चार-पाच लोक मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील आसावेत. परंतु, बाकीचे मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील लोक नसावेत. मला वाटते ते सगळे राजकीय स्वार्थाच्या भावनेने सुरू होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, बाकीच्या जिल्ह्यांमधील प्रमुख नेत्यांनाही अशा विरोधाचा सामना करावा लागत आहे. मलाच विरोध होत आहे असे नाही. केवळ मलाच विरोध होत असेल तर ते विरोधकांकडून जाणीवपूर्वक चालू असेल. केवळ इतकेच वाटते, की आंदोलन करत असताना कोणाचाही अवमान होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. परंतु, मला खात्री आहे की, ती माणसे जरांगे पाटलांची नाहीत.

Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभेचे तिनही उमेदवार वाडेश्वर कट्ट्यावर, रंगली ‘चाय पे चर्चा’, शहराच्या विकासावर मांडले मत (Video)

Related Posts