IMPIMP

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली चळवळ’

by pranjalishirish
PM Narendra Modi: 'Participating in Bangladesh's freedom struggle is the first movement of my life'

ढाका – बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणे, ही माझ्या जीवनातील पहिली चळवळ होती. मी आणि माझ्या सहकार्‍यांनी बांगलादेशातील लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मी २०-२२ वर्षांचा असेन, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi  यांनी केले. ते बांग्लादेशातील ढाका येथे बोलत होते.

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

दरम्यान, दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्‍यावर ढाका येथे दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi  यांनी प्रथम सावर येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट दिली आणि १९७१ मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी शांती पुरस्कार बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या मुलीला प्रदान केला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, की आम्हाला शेख मुजीबूर रहमान यांना गांधी शांती पुरस्काराने सन्मान करण्याची संधी मिळाली.

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

बांगलादेशसाठी केला सत्याग्रह :
आज भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांतील सरकार या संवेदनशीलतेची जाणीव करून घेत आहेत. तसेच या दिशेने अर्थपूर्ण प्रयत्न करीत आहेत. आम्ही दर्शविले आहे, की परस्पर विश्वास आणि सहकार्यामुळे प्रत्येक बाबीचे निराकरण होऊ शकते. आमचा भूसीमा करारदेखील याला साक्षीदार आहे.

दहशतवादाचा केला उल्लेख :
पाकिस्तान देशाचे नाव न घेता कटाक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi  म्हणाले, की व्यापार आणि उद्योग क्षेत्रात समान संधी असतानाही दहशतवादात अशीच आव्हाने आहेत.

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

पंतप्रधान मोदी म्हणाले, ’हा माझ्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय दिवस आहे. या कार्यक्रमात बांगलादेशने मला सामील केले, याबद्दल मी कृतज्ञ आहे. कोविड दरम्यान दोन्ही देशांनी एकत्र काम केले. बांगलादेशातील लोकांवर उपचार करण्यासाठी ‘मेड इन इंडिया’ ही लस वापरली जात आहे, याचा भारताला आनंद आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, इथल्या लोकांवर पाकिस्तानी लष्कराकडून होणारे अत्याचार आम्हाला व्यथित करीत आहेत. या फोटोंनी आम्हाला बरेच दिवस झोपू दिले नाही. बांगलादेशाच्या स्वातंत्र्य लढ्याला समाजाच्या प्रत्येक घटकाचे सहकार्य लाभले. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे प्रयत्न आणि त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका सर्वश्रृत आहे.’

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

 

मोदींच्या वक्तव्यावरून नेटकरांनी विचारले प्रश्न :
मात्र, नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरून नेटकर्‍यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी किती खोटं बोलत आहेत? हे सांगत आहेत.

Also Read

Coronavirus in Maharashtra : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी CM ठाकरेंचा मोठा निर्णय ! राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी

‘एप्रिल फूल’ समजू नका, नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार

जितेंद्र आव्हाडांचं ‘प्रत्युत्तर’, म्हणाले – ‘फडणवीसांनी ‘हे’ मान्य केलं तेच खूप झालं’

फोन टॅपिंग अहवाल लीक : रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल, सायबर सेल करणार पहिल्यांदा तपास

Related Posts