IMPIMP

मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘लोकं पंतप्रधान मोदींना लवकरच देव मानतील’

by pranjalishirish
pm narendra modiwill be worshipped lord ram future says uttarakhand new cm tirath singh rawat

नवी दिल्ली : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi  यांच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी अनेक देशांची नेतेमंडळी लाइनमध्ये उभे राहतात. प्रभू श्रीराम यांनी समाजासाठी चांगले काम केले होते. आता लोक त्यांना देव मानत आहेत. लोकं पंतप्रधान मोदींना Narendra Modi लवकरच देव मानतील’, असे विधान उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी केले आहे.

ऋषिकुल येथील सरकारी पी. जी. आयुर्वेदिक महाविद्यालय येथे आयोजित ‘नेत्र कुंभ’ या कार्यक्रमात तीरथ सिंह रावत बोलत होते. ते म्हणाले, ‘जगातील कोणत्याही नेत्याला आपल्या देशाच्या पंतप्रधानांशी Narendra Modi काही फरक पडत नसायचा. ती परिस्थिती वेगळी होती. पण आता हे सर्व बदलले आहे. पंतप्रधान मोदी यांनी नवा भारत निर्माण केला आहे. प्रभू श्रीराम यांनी समाजासाठी चांगलं काम केलं होतं. त्यामुळेच लोक त्यांना देव मानत होते. भविष्यात पंतप्रधान मोदींबाबतही असेच होईल. त्यांच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी अनेक देशांची नेतेमंडळी लाइनमध्ये उभे राहतात’.

RT-PCR रिपोर्ट गरजेचा नाही

कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत.
त्यानुसार विविध ठिकाणी RT-PCR रिपोर्ट दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मात्र, तीरथ सिंह रावत यांनी मोठं विधान केले आहे.
ते म्हणाले, ‘कोणत्याही उत्सवात जाण्यासाठी RT-PCR रिपोर्ट किंवा यात्रेकरूंना नोंदणी करण्याची गरज नाही.
कुंभमेळ्यात कोणत्याही काळजीशिवाय तुम्ही येऊ शकता’.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कामिनी पाटील

शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेते अन् मंत्र्याची बैठक, ‘या’ 3 महत्वाच्या प्रकरणांचा घेणार आढावा

Related Posts