IMPIMP

Pooja Chavan Suicide Case : CM उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांची ‘ती’ विनंती फेटाळली, अखेर दणका दिलाच

by nagesh
Pooja Chavan Suicide Case | sanjay-rathod-cm-uddhav-thackeray

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) मध्ये आरोप झाल्यानंतर शिवेसनेचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी 4 दिवसांपू्र्वी आपल्या वनमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 1 मार्च पासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळं त्याच्या एक दिवस आधी राठोडांचा राजीनामा घेण्यात आला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राठोडांचा राजीनामा स्विकारला असला तरी अद्याप तो मुख्यमंत्री कार्यालयाकडेच आहे असं वृत्त एका वाहिनीनं दिलं होतं. माध्यमात अशा बातम्या समोर आल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राजीनामा मंजूर केलाय अशी माहिती समोर आली आहे. राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली असून तो राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे.

दरम्यान राठोड यांनी 15 दिवस गायब राहिल्यानंतर पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं होतं. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनात हजारो कार्यकर्ते होते.
यामुळं ठाकरे सरकारला घेरायला (Uddhav Thackeray Government) भाजप (Bharatiya Janata Party – BJP) ला पुन्हा एकदा आयती संधीच मिळाली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तासांपूर्वी असं आवाहन करतात की, कोरोना रुग्ण वाढत आहेत, सर्वांनी आपापली
खबरदारी घेतली पाहिजे आणि त्यांच्या आदेशाला झुगारून संजय राठोड आणि कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करतात यावरून अनेकांनी टीका केली होती.
इतकंच नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेही राठोड प्रकरणामुळं नाराज होते.

शेवटपर्यंत राजीनामा घेऊ नये यासाठी संजय राठोड यांनी एकदा पोहरादेवी गडावरच्या महंतांशी बोला अशी विनवणी मुख्यमंत्र्यांना केली.
चौकशी होत नाही तोवर राजीनामा स्विकारू नये अशी विनंतीही त्यांनी केली होती.
परंतु ही विनंती फेटाळून लावत अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

पोलिसांनी महिलांना नाचवल्याच्या घटनेवर अनिल देशमुखांनी विधानसभेत दिलं स्पष्टीकरण ! म्हणाले- ‘समितीनं दिलेल्या अहवालानुसार…’

Related Posts