IMPIMP

Pooja Chavan Suicide Case : ‘मी निर्णय घेण्याआधी तू घे’, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच होणार संजय राठोडांची गच्छंती ?

by sikandershaikh
Pooja Chavan Suicide Case | sanjay-rathod-cm-uddhav-thackeray

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) मुळं आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काही दिवस बाकी असताना आता या प्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचं नाव आल्यानं सरकारला घेरण्यासाठी आता विरोधकांना आयती संधी सापडली आहे. 15 दिवस गायब राहिल्यानंतर पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं आहे. त्यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनावरूनही ठाकरे सरकारवर टीका झाली होती. पूजा चव्हाण प्रकरण आणि त्यानंतरचं शक्ती प्रदर्शन हे आयते मुद्दे विरोधकांना सापडले आहेत. (Pooja Chavan Suicide Case)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) 48 तासांपूर्वी असं आवाहन करतात की, कोरोना रुग्ण वाढत आहेत, सर्वांनी आपापली खबरदारी घेतली पाहिजे आणि त्यांच्या आदेशाला झुगारून मंत्री संजय राठोड आणि कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करतात यावरून अनेकांनी टीका केली होती. यामुळं सीएम ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाराजी व्यक्ती केल्याचंही समजत आहे. कारण यामुळं आघाडी सरकारची डोकदुखी आणखीच वाढली आहे. शरद पवार आणि सीएम ठाकरे यांच्यात याबाबत चर्चा झाली आहे अशी माहिती समोर आली आहे. मी निर्णय घेण्याआधी तू घे असं म्हणत मु्ख्यमंत्र्यांनी संजय राठोडांना बजावलं आहे असं वृत्त झी 24 तासनं दिलं आहे.

त्यामुळं आता अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संजय राठोड राजीनामा देण्याची शक्यता आहे.
1 मार्चपूर्वीच त्यांची गच्छंति होण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे.
विरोधकांनी यासाठी आक्रमक पवित्रा घेतलाच आहे.
सोबतच आता मित्रपक्ष देखील यामुळं नाराज आहेत असं समजत आहे.

दरम्यान भाजपनं राठोडांच्या राजीनाम्यावरून सरकारवर टीका केली आहे.
सजंय राठोड यांचा अधिवेशनापूर्वी राजीनामा ही बातमी मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमात पेरून सुसंस्कृत राजकारणाचा बुरखा पांघरण्याचा प्रयत्न केला आहे.
मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर असं लॉजिक यामागे आहे असा टोला भाजपनं लगावला आहे.

दरम्यान संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका भाजपनं घेतली आहे.
संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता.
अधिवेशनाच्या आधी राजीनामा घेणार असं बोललं जात आहे.
मग हे सरकार कसली वाट पहात आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या मंत्र्यांना संरक्षण देणारं हे सरकार आहे.
संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर अधिवेशन चालूच देणार नाही असं भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकारमध्ये मंत्री वाचला पाहिजे, राज्यातील गोर गरिबांच्या मुली मेल्या तरी चालतील अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

Related Posts