IMPIMP

Pooja Chavan Suicide Case : ‘CM ठाकरेंच्या नेतृत्वाची परीक्षा; नेत्याला अभय देणार की, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणार ?’

by sikandershaikh
pooja-chavan-suicide-cm-uddhav-thackeray-leadership-test-says-bjp-sudhir-mungantiwar-sanjay-rathod

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर (Pooja Chavan Suicide Case) राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. पूजा चव्हाण हिनं मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून आत्महत्याचा आरोप भाजप करत आहे. इतकंच नाही तर भाजप शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत हल्ला चढवत आहे. अशात आता संजय राठोड यांनी 15 दिवस गायब राहिल्यानंतर पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनावरून ठाकरे सरकारला घेरायला (Uddhav Thackeray Government) भाजप (Bharatiya Janata Party – BJP) ला पुन्हा एकदा आयती संधीच मिळाली. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आता यावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार ?

सुधीर मुनगंटीवार याबाबत बोलताना म्हणाले, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या निर्णयक्षमतेची परीक्षा आहे. मुख्यमंत्री म्हणून आपल्या पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना अभय द्यायचं की, या महाराष्ट्रात पक्षाबद्दल, लोकशाहीविषयी लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे असंही ते म्हणाले.

‘मुख्यमंत्री महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यास सक्षम आहेत की नाही हे दिसतंय’

पुढं बोलताना मुनगंटीवार म्हणाले, संशयाची सुई आपल्या एका मंत्र्यावर आहे.
ही संशयाची सुई दूर होईपर्यंत त्या मंत्र्याला पदावरून दूर करायचं का हे मुख्यमंत्र्यांना ठरवायचं आहे.
मुख्यमंत्री महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यास सक्षम आहेत की, नाही हे या प्रकरणावरून दिसतंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 48 तासांपूर्वी असं आवाहन करतात की, कोरोना रुग्ण वाढत आहेत,
सर्वांनी आपापली जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्यांच्या आदेशाला झुगारून शक्ती प्रदर्शन केलं जातं.
खुलेआम अपमानाचं प्रदर्शन शिवसेनेचा मंत्रीच करतो, मग सामान्य जनतेकडून काय अपेक्षा करणार आहे असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

‘अजित पवारांनीही स्वत: आरोपांनंतर राजीनामा दिला होता’

मुनगंटीवार असंही म्हणाले, अजित पवारांनीही स्वत: आरोपांनंतर राजीनामा दिला होता.
मंत्रिपदावरून जाणं म्हणजे कायमच जाणं होत नाही.
चौकशी अहवालातून जे काही सत्य समोर येईल त्यानंतर मंत्रिपद पुन्हा मिळू शकतं.
राजकीय पक्ष वाईट लोकांचा समूह आहे ही व्याख्या लोकांच्या मनात निर्माण होते आहे.
ज्या दिवशी ही घटना घडली, त्यानंतर ऑडिओ क्लीप, फोटो व्हायरल होत आहेत. निश्चित कुठेतरी पाणी मुरतंय हे कोणी लहान मुलगाही सांगेल.
शरद पवारांनी शक्ती प्रदर्शनावर नाराजी व्यक्त केली ते योग्यच आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

विनायक मेटेंचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल, म्हणाले- ‘पूजा चव्हाण प्रकरणात उद्धव ठाकरेंची नेमकी मजबुरी काय ?’

Related Posts