IMPIMP

Pravin Gaikwad | ‘मराठा ही बिझनेस कम्युनिटी व्हावी’, प्रवीण गायकवाड यांचे प्रतिपादन

by nagesh
Pravin Gaikwad | ‘Maratha should be a business community’ – Praveen Gaikwad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन    Pravin Gaikwad | मराठा ही खूप व्यापक ओळख असून, महाराष्ट्रातील सर्व लोकांना राज्य आणि देशाबाहेर मराठा म्हणून ओळखले जाते. भविष्यात ही मराठा कम्युनिटी बिझनेस (Maratha Community Business) म्हणून ओळखली जावी, असे माझे स्वप्न आहे. त्यासाठीच ‘अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला’ ही संकल्पना घेऊन संभाजी ब्रिगेडची (Sambhaji Brigade) भविष्यातील वाटचाल व्हावी, असे प्रतिपादन मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे (Maratha Seva Sangh-Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी केले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडच्या वतीने विमाननगर येथे हॉटेल हयात रिजन्सी मध्ये (Hotel Hyatt Regency) बिझनेस कॉन्फरन्सचे (business
conferences) आयोजन करण्यात आले होते. कॉन्फरन्सचे उद्घाटन बारामती अॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आमदार रोहित पवार (Baramati
Agro CEO MLA Rohit Pawar) यांच्या हस्ते झाले.

 

यावेळी यूकेज रिसॉर्टचे (UKage Resort) संतोष पाटील यांनी ‘शाश्वत उद्योगाची पायाभरणी’ या विषयावर मार्गदर्शन केले. चिंतामणी मोटर्सचे उज्ज्वल
साठे यांनी ‘बिझीनेस आणि बिझनेस’ ही संकल्पना पटवून दिली. युवा युद्योजक अजयसिंह सावंत यांनी ‘दुबई बिझनेस टूर’ आणि उद्योगभारतीचे संचालक
महेश कडूस-पाटील यांनी ‘इस्त्राईल अॅग्रिकल्चरल टूर’ या विषयांवर परदेशातील नोकरी, व्यवसाय व तंत्रज्ञान यातील संधीची ओळख करुन दिली.

 

इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनचे (Import Export Federation) संस्थापक अभिजित शिंदे यांनी आयात-निर्यातीबाबत शंकांचे निरसन केले. निवृत्त अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी ‘नॉलेज-स्किल-अॅटिट्यूड’ यासंदर्भात मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात प्रसिद्ध कलाकार भरत जाधव (Bharat Jadhav), अशोक समर्थ सैराट फेम व झुंड या चित्रपटाचे निर्माते नागराज मंजुळे (Nagraj Manjule) व नवोदित कलाकार ‘कारभारी लयभारी’ फेम निखिल चव्हाण यांनी यशस्वी होण्यासाठीचा आपला अनुभव उद्योगाशी सांगड घालत अनेक पैलु उघड केले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीरराजे भोसले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महासचिव सुभाष बोरकर, आत्माराम शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र आढाव, छगन शेरे, शरद चव्हाण, कार्याध्यक्ष हिंदुराव हुजरे पाटील, अमोल काटे, दिनेश इंगोले यांनी काम पाहिले. सुत्रसंचालन कवी स्वप्नील चौधरी व प्रज्ञेश मोडक यांनी केले.

 

 

Web Title : Pravin Gaikwad | ‘Maratha should be a business community’ – Praveen GaikwadPravin Gaikwad | ‘Maratha should be a business community’ – Praveen Gaikwad

 

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; पुण्यासह ‘या’ 18 जिल्ह्यांना हाय अलर्ट

Ajit Pawar | पुण्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक – अजित पवार

Sharad Pawar | एकाचवेळी ED च्या इतक्या कारवाया यापुर्वी कधी पाहिल्या होत्या का? – शरद पवार

 

Related Posts