IMPIMP

राणी चांदबीबीच्या वंशजांचं आदित्य ठाकरेंना पत्र, केली ‘ही’ मागणी

by amol
aditya-thackeray-rani-chand

पनवेल : सरकारसत्ता ऑनलाइन – Rani Chandbibi | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. नोटबंदीनंतर अर्थव्यवस्थेला फटका बसलेला असताना कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील घटकांना फटका बसला आहे. कोरोनामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात पर्यटनाच्या दृष्टीने विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. याकरिता पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी स्पॅन महिला अ‍ॅग्रो टुरिझम संस्थेच्या अनिसा शेख यांनी केली आहे.

अनिसा शेख या अहमदनगरच्या राणी सुलताना चांदबीबी (Rani Chandbibi) यांच्या वंशज आहेत. सुलताना चांदबीबी यांनी मुघलांना महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. शेख यांच्या संस्थेच्या जवळपास नऊ हजार महिला सभासद आहेत. नवी मुंबईतील निसर्गाने परिपूर्ण अशा खारघर हिलवर शेख यांचा अ‍ॅग्रो टुरिझम प्रकल्प आहे.
या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पती, वृक्षलागवड यासह निसर्गाच्या रक्षणासाठी त्या प्रयत्न करीत आहेत.
सध्या विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास न करता पर्यटनाला उभारी देण्याची गरज असल्याचे मत अनिसा शेख यांनी व्यक्त केली.

अनिसा शेख यांनी म्हटले आहे की, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
यामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश असून ते कौतुकास्पद आहे. परंतु पर्यटन क्षेत्रावरदेखील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
महाराष्ट्रातील दुर्गम भागातील आदिवासी महिलांपासून शहरी सुशिक्षित महिलांनादेखील यामध्ये सामावून घ्यावे,
अशी मागणी त्यांनी केली आहे.
जागतिक महिला दिन सप्ताह निमित्ताने विविध क्षेत्रात कौतुकास्पद काम केलेल्या महिलांचा सत्कार कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे शेख यांनी सांगितले.

Related Posts