IMPIMP

Pune Corporation Election | आगामी महापालिका सभागृहात दिसणार 70 टक्के नवीन चेहेरे !

by nagesh
Pune PMC Election 2022 | Prabhag Ward structure unlikely to change after change of power in maharashtra ! Elections for local bodies will be held in September - trust the administrative authorities

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन महापालिकेत (Pune Corporation Election) एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीमुळे आगामी निवडणुकीमध्ये (Pune Corporation Election) रंग भरणार आहेत. एक सदस्यीय वॉर्ड मुळे आरक्षण आणि वॉर्ड रचनेमधील बदलामुळे पुढील सभागृहात 70 टक्क्यांहून अधिक नवीन चेहेरे दिसतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याचा सर्वाधिक फटका सत्ताधारी भाजपला (BJP) बसणार असून महाविकास आघाडीला (maha vikas aghadi) चांगले बळ मिळेल, असे चित्र वरकरणी दिसून येत आहे.

पुणे महापालिकेत (Pune Corporation) यापुर्वी 2007 मध्ये एक सदस्यीय वॉर्ड रचनेनुसार निवडणूक झाली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सर्वाधिक जागांवर विजय मिळविला होता. काँग्रेस (Congress) सोबत आघाडी करत राष्ट्रवादीचा पहिला महापौर (Mayor) निवडला गेला होता. 2012 मध्येही द्विसदस्यीय रचनेतही याचीच पुनरावृत्ती झाली होती. मात्र 2014 मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्या नंतर भाजपने मुंबई (BJP Mumbai) वगळता सर्वच महापलिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना करत मिनी विधानसभेचे स्वरूप दिले आणि पक्षीय चिन्हावर निवडणुका नेल्या. त्यामध्ये यशस्वी देखील झाले. पुणे (Pune), पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad), नाशिक (Nashik) सारख्या मोठया महापलीकेत एक हाती सत्ता देखील मिळवली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

परंतु राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने (maha vikas aghadi government) नगराध्यक्ष निवडणूक तसेच प्रभाग सदस्यीय निवडणुकीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पक्षीय चिन्हासोबतच उमेदवाराची ताकत असा हा सामना आगामी निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

164 नगरसेवक संख्या असलेल्या महापालिकेत सध्या भाजपचे सर्वाधिक अर्थात 97 नगरसेवक आहेत. यामुळे बहुतांश प्रभागात भाजपचेच चारही नगरसेवक आहेत. 42 मधील केवळ मुंढवा – हडपसर (Mundhwa-Hadapsar), वारजे (Warje Malwadi)आणि भारती विद्यापीठ – आंबेगाव (bharti vidyapeeth-ambegaon) या 3 प्रभागातच भाजपचा एकही नगरसेवक नाही. वॉर्ड रचना झाल्यास 39 प्रभागांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी सध्याच्या नगरसेवकांमध्ये स्पर्धा लागणार आहे.

यामाध्ये महिला आरक्षण , अनुसूचित जाती, जमातींसाठी आरक्षण यामुळे काही नगरसेवक स्पर्धेतून बाहेर पडणार आहेत. महापालिकेतील सत्तेमुळे भाजपने शहर स्तरावर बांधणी करताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ते देखील स्पर्धेत आले आहेत. त्यामुळे सत्ताकाळात अगदीच दुय्यम वागणूक मिळालेल्या आयाराम नगरसेवकांविरोधात मोर्चेबांधणीला सुरुवात होणार आहे. डावलले जात असल्याचा मानसिकतेमुळे अनेक नगरसेवक घर वापसीच्या तयारीत आहेत. त्यामुळे ऐन प्रचारात भजपापुढे अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे.

मागील निवडणुकीत सत्तेचा वापर करत भाजपने अनेक ‘बाहुबली’ दावणीला बांधले होते. साम, दाम, दंड ,भेद या फडणवीस यांच्या रणनीतीला महाविकास आघाडीने ब्रेक लावला आहे. मागिल निवडणुकीत भाजपला मदत करणारे अनेक ‘बाहुबली’ मोक्का (MCOCA) Mokka मध्ये तुरुंगात गेले आहेत. त्याची उणीव यंदा भाजपला जाणवणार आहे.

भाजपला सत्तेततून बाहेर काढणे हा एकमेव कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारने आखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेची (Shivsena) शहरात आपापली पॉकेट्स आहेत. त्या त्या ठिकाणी मित्र पक्षाला बळ देणे आणि निवडणूक पूर्व अथवा पश्चात आघाडी करून सत्ता मिळवणे हा राज्यस्तरीय कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्याची ठरल्याप्रमाणे अंमलबजावणी झाल्यास भाजपची डोके दुःखी वाढणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मागील वेळी दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवणाऱ्या ‘मनसे’ने पुणे शहरात (MNS, Pune City) बऱ्या पैकी संघटन बांधणी केली आहे.
मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने कोथरूड (Kothrud Assembly constituency),
शिवाजीनगर (Shivajinagar Assembly constituency),
पर्वती (Parvati Assembly constituency) ,
कसबा (Kasaba Assembly constituency)
या विधानसभा मतदार संघांमध्ये ते भाजपच्या मतांचीच विभागणी करणार हे जवळपास निश्चित आहे.
‘मनसे’ने भाजप सोबत युती केली तरी कोथरूड, कसबा , शिवाजीनगर , पर्वती या मतदार संघात विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कट केल्याशिवाय युती होऊच शकणार नाही हे स्पष्टच आहे.

भाजपची आरपीआय (RPI) सोबत युती आहे.
आरपीआय चे पाच नगरसेवक कमळ या चिन्हावर निवडून आले आहेत. आरपीआय ला यंदा काही जास्तीच्या जागा सोडव्या लागणार आहेत.
राज्यातील सत्तेमुळे महामंडळांवर समाधान मानलेले आरपीआय चे पदाधिकारी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.
अशातच विधानसभा निवडणुकीत 8 पैकी एकाही मतदार संघात संधी न दिल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे.
ही नाराजी वाढीव जागांमध्ये परावर्तित करण्यासाठी आरपीआय कडून प्रयत्न होणार आहेत, असे दिसते.

या सर्व राजकीय गणितांसोबतच नगरसेवकांचा परफॉर्मन्स हा मोठा आणि महत्वाचा मुद्दा उमेदवारी देताना केंद्रस्थानी राहणार आहे.
याला कारण मागील पाच वर्षात अनेक माननीय यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करणे, चर्चेत आभावानेच सहभाग नोंदवला आहे.
बाकडे बसवणे, वाचनालये आणि बस थांब्यांवर जाहिरातबाजी, व्यायाम साहित्य, भिंती रंगवणे या पलीकडे फारसा ठसाच उमटवलेला नाही.
पक्षातील एकाधिकारशाही मुळे अनेकांना चांगले उपक्रम राबवण्याची इच्छा असतानाही केवळ पक्षशिस्तीमुळे ते पूर्णत्वास नेता आले नाहीत.
गॅस,पेट्रोल, डिझेल दरवाढ हे थेट सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडवणारे मुद्दे देखील काठावरचा मतदार विरोधकांकडे झुकवण्यास कारणीभूत ठरणार आहेत.
यामुळेच नवीन सभागृहात 70 टक्के नवीन चेहेरे दिसतील असे सध्याचे तरी चित्र आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Titel :  Pune Corporation Election | 70% new faces to appear in upcoming Municipal Hall!

 

हे देखील वाचा :

Modi Government | 12 कोटी लोकांवर मोदी सरकार होणार मेहरबान, वार्षिक मिळतील 12000 रुपये; जाणून घ्या

Trojan Triada Virus | अलर्ट! गुगल प्ले स्टोअरवर बनावट WhatsApp, चुकूनही करू नका डाऊनलोड; अन्यथा…

Samriddha Program | जर तुम्हाला सुरू करायचाय नवीन स्टार्टअप, तर 40 लाख रुपये देईल मोदी सरकार; ‘या’ पद्धतीने घेऊ शकता फायदा

 

Related Posts