IMPIMP

Pune Municipal Corporation । पुणे महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 23 गावाबाबत अजित पवारांचा महत्वपूर्ण निर्णय

by bali123
Pune Municipal Corporation | ajit pawar take important decision regarding the villages included in the pune municipal corporation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Municipal Corporation । मागील काही महिन्यात पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत 23 गावांचा समावेश करणारा प्रस्ताव राज्य शासनाकडे सुपूर्द करण्यात आला होता. या विषयावर आता राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेत यावर शिकामोर्तब केला आहे. पुणे महापालिका हद्दीत समावेश करण्यात आलेल्या 23 गावातील शाळा, जमिनी, अंगणवाड्या या सर्व जागा पुणे महापालिकेकडे (Pune Municipal Corporation) हस्तांतरित करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्व विभागांना मंजुरी दिली असल्याची माहिती शिवसेना नेते आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिलीय.

पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच अजित पवार यांनी असा निर्णय घेतला आहे. याबाबत मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सांगितलं आहे की, ‘अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला पुण्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महापौरांनीही या बैठकीला उपस्थित राहायला हवं होतं. त्यांना व्यक्तिगत निमंत्रण देण्यात आलं होतं की नाही याबाबत आपल्याला माहिती नाही असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, ‘पुणे महापालिकेच्या हद्दवाढीतील सर्व शाळा, पाणीपुरवठा योजना, स्मशानभूमी यांचा महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे असं सांगत ते म्हणाले, नगरविकास, महसूल, ग्रामविकास या सर्व विभागांना एकत्र आणून या गावांबाबत निर्णय घेण्यात आला. महापालिका कशी सक्षम होईल त्या दृष्टीकोनातून ही बैठक होती. ही कुठलीही राजकीय बैठक नव्हती, तर शासकीय बैठक होती. अशी माहिती सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात पुणे शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटीबध्द असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

तसेच, या भागाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय व सहकार्याने
काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तर, पुणे महापालिका हद्दीतील म्हाडाच्या जुन्या
मोडकळीला आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनाची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या, तसेच हद्दीत
समाविष्ट गावांमधील शाळा, अंगणवाड्या पुणे महापालिकेला (Pune Municipal
Corporation) हस्तांतरीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना देखील पवार
(Ajit Pawar) यांनी दिल्या आहेत.

बैठकीदरम्यान, पुण्यातील समस्यांबाबत पुणे शहराच्या जलद व सर्वसमावेशक विकासासाठी राज्य
सरकार कट्टीबध्द असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शिवणे,
उत्तमनगर, कोंढवे-धावडे पाणीयोजनांचे हस्तांतर तसेच पुणे महानगरपालिका (Pune Municipal
Corporation) विकास आराखड्यातील बालग्राम प्रमाणेच अग्रसेन शाळेची जागा महापालिकेला
हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना देखील अजित पवार यांनी दिल्या.

Web Titel : Pune Municipal Corporation | ajit pawar take important decision regarding the villages included in the pune municipal corporation

Related Posts