IMPIMP

Sharad Pawar | ‘महाविकास’ सरकार 5 वर्षे टिकणार, तिन्ही पक्षात मतभेद नाहीत’

by bali123
Presidential Election 2022 | aam aadmi party aap will support ncp sharad pawar as candidate for presidential polls sources

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन Sharad Pawar | महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) स्थापन करताना आम्ही काही मुद्यांवर एकत्र आलो. त्याचवेळी किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मात्र सरकार चालवत असताना काही ना काही प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. कोणत्याही महत्वाच्या धोरणात्मक (Strategic) प्रश्नासाठी हे सर्व सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळं हे सरकार अत्यंत व्यवस्थित चालले आहे. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल (government will complete its five-year term) याबद्दल शंका नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला आहे. there is no doubt mahavikas aghadi government will complete five years term there are no differences between

आमच्यात कुठेही मतभेद नाहीत

राजकारणात प्रत्येक पक्ष आपआपली संघटनात्मक ताकद वाढवत असतो. यामध्ये काही गैर नाही. शिवसेना (Shivsena) असो, काँग्रेस (Congress) किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असो सर्व पक्षांना संघटना वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. याबद्दल आमच्यात सामंजस्य असून कुठेही मतभेद नाहीत, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi government) पदोन्नती आरक्षण (Promotion reservation) आणि ओबीसी आरक्षणावरुन (OBC reservation) कुरबुरी वाढल्या होत्या. यातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांच्या पत्रामुळे भाजप-शिवसेना युतीची (BJP-Shivsena Alliance) चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. या सर्व पार्श्वभूमीवर बारामती (Baramati) येथील गोविंदबाग (Govindbagh) या निवासस्थानी आज शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

धोरणात्मक निर्णयासाठी सहा जणांची नेमणूक

सरकार चालवताना काही ना काही प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे.
यामध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अशोक चव्हाण (Ashok Chavan), शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde), सुभाष देसाई (Subhash Desai)
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि जयंत पाटील (Ajit Pawar and Jayant Patil) हे समन्वय साधून काम करत आहेत.
सरकारमध्ये काही अडचण आल्यास धोरणात्मक निर्णय हे सहा जण घेत असतात. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे चालेल,
याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असा विश्वास शरद पवार यांनी बोलून दाखवला.

Web Titel :- sharad pawar | there is no doubt mahavikas aghadi government will complete five years term there are no differences between

Related Posts