IMPIMP

‘परमबीर सिंग आणि इतर प्रकरणे दाबण्यासाठी कोविड आणला का?’, आंबेडकरांची खरमरीत टीका

by pranjalishirish
reverse your decision people rebel prakash ambedkar s implicit warning thackeray government

पुणे : देशात कोरोना व्हायरसचे थैमान सुरुच आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यावरूनच आता वंचित बहुजन विकास आघाडीचे संस्थापक व अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar  यांनी राज्य सरकार वर गंभीर आरोप करत टीका केली. ‘परमबीर सिंग आणि इतर प्रकरणे दाबण्यासाठी कोविड आणला का ?’, असा सवाल उपस्थित केला.

फक्त शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देण्याची जबाबदारी आहे का ?

पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ऍड. आंबेडकर Prakash Ambedkar बोलत होते. ते म्हणाले, ‘लॉकडाऊनला आधी आम्ही विरोध केला. त्यानंतर भाजपने केला आहे. भाजप कॉपी कॅट आहे. हातावर पोट असणारे इथे अनेक लोक आहेत. या सर्व घटकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाची ताकद कमी झाली असे आरोग्यमंत्री सांगत आहेत तर दुसरीकडे लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेत आहे. दुकानदार ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांनी दुकान उघडले तर आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत.’

Pravin Darekar : ‘मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन्…’

दरम्यान, पंढरपूर देवस्थान बाहेरील व्यावसायिकांना भिक्षा मागण्याची वेळ आली आहे. लोकांनी बगावत करण्याआधी ठाकरे सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा. नंतर मग आम्ही एक आणि तुम्ही दुसरी भूमिका घेत आहात, असे म्हणू नये. तसेच अमित शहा देशाचे मालक नाहीत, प्रत्येकजण मालक आहे, असेही ते म्हणाले.

Read More : 

Coronavirus Cases India : देशात पहिल्यांदा एका दिवसात नोंदली गेली संसर्गाची 1.07 लाख प्रकरणे, केंद्राने लोकांना केले ‘हे’ आवाहन

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

‘खा. प्रताप पाटील-चिखलीकरांची माणसे निवडून देऊ नका, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल’; भाजपमधील गटबाजी उघड

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

आ. शिवेंद्रराजे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘Lockdown लावून प्रशासनाकडून मोगलाई’

Related Posts