IMPIMP

सचिन वाझेंच्याच घराचे फुटेज गायब का केलं?, प्रश्न अनुत्तरित

by pranjalishirish
sachin vaze arrest case why did footage of vazes house disappear by ciu team

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे sachin vaze यांच्या अटकेनंतर रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या ‘क्राईम इंटेलिजन्स युनिट’ने तपास सुरू केला. त्यानुसार, 27 फेब्रुवारीला सचिन वाझे राहत असलेल्या साकेत कॉम्पलेक्स इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज डीव्हीआरसह घेऊन गेले होते. यातील विशेष बाब म्हणजे सचिन वाझे यांचे सीआययू पथकच हे सीसीटीव्ही फुटेज घेऊन गेल्याने त्यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठाणे येथील साकेत कॉम्पलेक्समध्ये सचिन वाझे sachin vaze राहतात. 27 फेब्रुवारीला साकेत कॉम्पलेक्स येथे सीआययूचे पथक पोहोचले. तपासासाठी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज पाहिजे, असे सोसायटी कार्यालयातील सदस्यांना सांगितले. मात्र, ‘लेखी दिल्याशिवाय असे आम्ही काहीच करू शकत नाही’, असे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगत नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी एका कागदावर लिहून दिले होते.

दरम्यान, सीआययूच्या पथकाने सचिन वाझे sachin vaze यांच्याच घरचे सीसीटीव्ही फुटेज का जप्त केले आणि तेही कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी हे जप्त केले आणि पुढे या फुटेजचे काय केले? हा सर्व प्रकार सचिन वाझे यांच्यासह त्यांचे वरिष्ठ पोलीस उपायुक्त, पोलिस सहआयुक्त यांना माहिती होता का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत.

काय लिहिले होते कागदावर…

‘सेक्शन 41 CRPC कलमानुसार, आम्ही साकेत सोसायटीला ही नोटीस देतोय की, मुंबई क्राईम ब्रांच CIU DCB CID MUMBAI यांनी रजिस्टर केलेल्या क्राईम रजिस्टर 40/21 गुन्ह्यानुसार, कलम 286, 465, 473, IPC 120 (B), INDIAN EXPLOSIVE ACT 4 (a)(b)(i) गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तपासासाठी आम्हाला आपल्या साकेत सोसायटीच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिजे आहे. त्यानुसार, आपल्या इमारतीतील 2 DVR हे आम्हास घेऊन जायचे आहेत. या नोटीशीनुसार आम्ही आपल्या सीसीटीव्ही फुटेज द्यायचे आदेश देत आहोत.’

Also Read : 

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

Related Posts