IMPIMP

Prakash Javadekar : ‘महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’

by pranjalishirish
sachin vaze case prakash javadekar says maharashtra government dont have right stay power

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन : परमबीर सिंग यांचा ‘लेटरबॉम्ब’, सचिन वाझे प्रकरण, हफ्तेखोरीत अनिल देशमुख यांच्यावरील आरोप या सर्व प्रकरणानंतर ठाकरे सरकारवर सातत्याने टीकास्त्र सोडले जात आहे. त्यानंतर केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर Prakash Javadekar यांनीही घणाघाती टीका केली. ‘महाराष्ट्रात गेल्या 30 दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळाचा रेकॉर्ड ठेवणेही कठीण काम आहे. इतके महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम ‘महावसुली’ आघाडी सरकारने केल्याचे जावडेकर Prakash Javadekar म्हणाले.

Pandharpur : दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेणार, अजित पवारांचे व्यापाऱ्यांना आश्वासन

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली आहे. सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार उरलेला नाही. वाझेने लिहिलेल्या पत्रात अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. हे अतिशय गंभीर आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणारं प्रकरण आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा व्यक्तीचे शेवटपर्यंत समर्थन का केले? वाझे काहीतरी खुलासे करेल म्हणूनच त्याला पाठिशी घातले जात होते. सचिन वाझे प्रकरणात इतकं काही घडत असताना राज्याचे मुख्यमंत्री अद्याप गप्प का आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये’, दवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले

दरम्यान, मंत्र्यांनी पोलिसांना वसुली करायला लावणे हे अतिशय गंभीर आहे. पोलिस बॉम्ब ठेवतात हे प्रकरण जगातील एकमेव प्रकरण असावे. पोलिसांना वसुली करायला लावणे हाच राज्य सरकारचा ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ आहे, अशी टीकाही जावडेकर Prakash Javadekar यांनी केली. तसेच रोज या प्रकरणात इतके काय-काय समोर येत आहे की याचा रेकॉर्ड ठेवणेही कठीण झाले आहे, असेही ते म्हणाले.

Read More : 

Coronavirus : न्यूझीलंडने भारताबाबत घेतला मोठा निर्णय, 28 एप्रिलपर्यंत ‘नो एंट्री’

Chitra Wagh : ‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…

Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’

संभाजी भिडे यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘कोरोना अस्तित्वात नाही, जे जगायचे ते जगतील अन् मरायचे ते मरतील’

महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचा पुरवठा अधिक, राजेश टोपेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

‘महाराष्ट्राला सर्वात जास्त लसी मिळायला हव्यात, मात्र मुद्दाम दिल्या जात नाहीत’, जयंत पाटलांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

‘खंडणीचे आरोप निराधार, माझी नार्को टेस्ट करा’ ! परब यांचे आव्हान

शरद पवारांची केंद्र सरकारसोबत चर्चा, केंद्र सरकारने दिले ‘हे’ आश्वासन

Keshav Upadhye : ‘…पण शरद पवारांना खोटं पाडू नका’

Related Posts