IMPIMP

Sanjay Raut | अजितदादा आमच्या माणसाचं थोडं ऐकत जा ! नाहीतर गडबड होईल, संजय राऊतांचे सूचक विधान (व्हिडीओ)

by bali123
Maharashtra Political News | sanjay raut spread fake news about ajit pawar allege chandrashekhar bawankule

पिंपरी चिंचवड : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेचे फायरब्रांड नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज पुणे जिह्याच्या दौऱ्यावर आहेत. पिंपरी चिंचवड येथे शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री अजित पवार हे शिवसेना नेते व कार्यकर्त्यांच ऐकत नसल्याचं गाऱ्हाणे अनेकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) यांची अजितदादांना (Ajit Pawar) कानपिचक्या दिल्या आहेत.

 

 

 

मेळाव्यात बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, महाराष्ट्रात सत्ता आपली असली तरी, आपलं इथं कोणी ऐकत नाही असं म्हणतात. अस कस काय होईल. हे होता कामा नये. मुख्यमंत्री शिवसेनेचे (Shivsena) आहेत. अजित पवार हे देखील मुख्यमंत्र्यांच ऐकतात, त्यांना आपण सांगू कि अजितदादा आमच्या माणसाचं थोड ऐकत जा! नाहीतर गडबड होईल. तसही मुख्यमंत्री आज दिल्लीला गेलेले आहेतच, असं राऊत यांनी म्हणताच सभागुहात हसा पिकला. मात्र, नंतर लगेचच त्यांनी आपल्या विनोदी शैलीने सारवासारव देखील केली.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

चुकीच ऐकू नका माझ पूर्ण ऐका आणि मग लिहा नाहीतर, लगेच ब्रेकिंग सुरु होईल. भविष्यकाळ हा शिवसेनेचा आहे. उद्या दिल्लीवर देखील आपल्याला राज्य करायचं आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घेयला गेले आहेत. प्रधानमंत्री कुठे बसतात, गृहमंत्र्यांचे कार्यालय कुठे आहे, हे सगळ आपल्याला जाणून घ्याव लागेल. या सगळ्याचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत, असंही राऊत यावेळी म्हणाले.

पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेच 100 नगरसेवक निवडून यावे, अस मी कधी म्हणणार नाही.
पण एवढे नगरसेवक निवडून यावेत की महापौर हा शिव सेनेचाच व्हायला हवा.
बाळासाहेबांचा जन्म पुण्यात झाला. मात्र, या पुण्यात आपल्या पक्षाची सत्ता नसल्याची खंत आमच्या मनात आहे.
महापालिका निवडणूक ही आम्हाला सर्वाना सोबत घेऊन लढायची आहे.
परंतु आलात तर तुमच्या सोबत नाहीतर तुमच्या शिवाय लढू, असा नारा यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे.

Web Titel :- Sanjay Raut | Ajitdada, listen to our man a little! Otherwise it will go wrong, Sanjay Raut’s suggestive statement (video)

Related Posts