IMPIMP

नारायण राणेंचा थेट सवाल म्हणाले – ‘API सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे?’

by pranjalishirish
sanjay raut rokhthok article narayan rane slams anil deshmukh cm uddhav thackeray

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी सचिन वाझे प्रकरण (Sachin Vaze) वरून आता राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राणे यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या रोखठोक लेखाचा आधार यावर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेबद्दल असं काय प्रेम आहे ? मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेच्या पार्श्वभूमीची माहिती कशी नाही ? सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे ? असे अनेक सवाल राणेंनी केले आहेत.

संतापलेल्या भाजप खासदार बाबुल सुप्रियोंनी थेट कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात लगावली, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

राऊतांचा लेख म्हणजे लेकी बोले, सुने लागे’

नारायण राणे  Narayan Rane म्हणाले, राज्यात गेल्या सव्वा वर्षापासून राजकीय धुळवड सुरू आहे. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊतांनी पहिल्यांदाच सरकारच्या चुका दाखवून दिल्या आहेत. सचिन वाझेला वाढवलं, त्याचे दुष्परिणाम सरकारला भोगावे लागत आहेत. संजय राऊतांचा लेख म्हणजे लेकी बोले, सुने लागे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या चुका नाव न घेता दाखवून दिल्या आहेत असंही राणे म्हणाले.

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

‘सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे ?’

पुढं बोलताना राणे Narayan Rane  म्हणतात, परमबीर सिंग प्रकरणात मुख्यमंत्र्यांना या सर्व गोष्टी माहित नव्हत्या का. सचिन वाझेनं मनसुख हिरेनची हत्या केल्यानंतर देखील त्याला अटक करू देत नव्हते. मुख्यमंत्र्यांना त्यांच्याबद्दल असं काय प्रेम आहे ? मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेच्या पार्श्वभूमीची माहिती कशी नाही ? सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे ? असे अनेक सवाल राणेंनी केले आहेत.

‘आधी म्हणाले नव्या पिढीला शरद पवार यांचं राजकारण कळणार नाही, आता म्हणत आहेत ‘ती’ फक्त अफवा’

संजय राऊतांच्या रोखठोक लेखात नेमकं आहे तरी काय ?

संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक स्तंभातून सचिन वाझे प्रकरणापासून टीकेच्या केंद्रस्थानी असलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. राऊत म्हणाले होते की, अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघातानं मिळालं आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपद स्विकारण्यास नकार दिला. तेव्हा शरद पवार यांनी हे पद अनिल देशमुख यांच्याकडे दिलं असं या लेखात म्हटलं आहे.

शरद पवार आणि अमित शहांची बहुचर्चित भेट ? 2 दिग्गज नेत्यांच्या भेटीबाबत राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया ! कोण काय म्हणाले ? जाणून घ्या

‘सचिन वाझे फक्त सहायक पोलीस निरीक्षक होता, त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशानं दिले ?’

या लेखात असाही उल्लेख आहे की, सचिन वाझे हे आता रहस्यमय प्रकरण झालं. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा सचिन वाझे फक्त सहायक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशानं दिले हा चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करत होता, तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी ? असा सवालही राऊत यांनी केला आहे.

Also Read

संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात, म्हणाले – ‘राज्यातला नेता जेव्हा वारंवार दिल्लीकडे तोंड करून बघतो’

Video : ‘एवढं तर मी मुख्यमंत्र्यांसाठी देखील करत नाही’, भाजपनं शेअर केला संतापलेल्या नुसरत जहाँचा व्हिडीओ

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत माहिती

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

निवृत्त न्यायमूर्तींकडून ‘त्या’ प्रकरणाची चौकशी करण्यात येणार !

Related Posts