IMPIMP

‘प्राण जाये पर वचन न जाये’, असं उद्धव ठाकरेंचं कार्य’, मुख्यमंत्र्यांची पाठराखण

by pranjalishirish
sanjay raut supports uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोना लसीच्या तुटवड्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. कोरोना लसीकरण प्रक्रियेला महाराष्ट्रामुळे खोडा बसल्याचा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे. मंत्र्यांच्या आरोपानंतर राज्यातील नेत्याकडून तिव्र निषेध करण्यात आला आहे. तरी देखील केंद्राकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या मुद्यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे.

Nitesh Rane : ‘सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ

संजय राऊत Sanjay Raut म्हणाले, संपूर्ण देशाचा भार महाराष्ट्रावर आहे. स्थलांतरित मजूर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहेत. गुजरातमधील भाजपच्या कार्यालयात पाहिजे तेवढी रेमडेसिवीर मिळत आहेत. अशा कृत्यांमुळे हे राष्ट्र एक असलं तरी ते एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय असं दिसत नाही. याउलट केंद्राने दिलेल्या गाईडलाईन महाराष्ट्राने तंतोतंत पाळल्या आहेत. प्राण जाये पर वचन न जाये, अशा पद्धतीचे कार्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत केले आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यात लॉकडाऊन असेल तर विरोधी पक्ष आंदोलन करेल असं विरोधक म्हणत आहेत. तसेच केंद्राकडून राज्याची बदनामी केली जात आहे. अशा वक्तव्यांचा निषेध हा महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेत्यांनी सर्वात आधी केला पाहिजे. कारण हा महाराष्ट्राचा अपमान आहे. पण जर त्यांना महाराष्ट्राचा अपमान आहे असे वाटत नसेल, तर महाराष्ट्रात राजकारण करण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही, अशा शब्दात राऊत Sanjay Raut  यांनी भाजप नेत्यांना खडसावलं आहे.

‘महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी ?’

संजय राऊत म्हणाले, जर महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड हे तीन राज्य कोरोना लढण्यात अपयशी ठरले, असे केंद्रीय सचिवांचे म्हणणे असले तर सर्वात आधी हे केंद्र सरकारचे अपयश आहे. कारण कोरोनाची लढाई ही पंतप्रधान मोदी याच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली लढली जात आहे. केंद्राने दिलेल्या प्रत्येक सूचनांचे पालन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या राज्यांना अपयश आले असे केंद्र म्हणत असेल तर हे केंद्राचे अपयश म्हटलं पाहिजे, असे स्पष्ट मत राऊत यांनी व्यक्त केली.

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

राऊत पुढे म्हणाले, माला याचं आश्चर्य वाटतं, जी तीन राज्यं अपयशी ठरलं असं सचिव म्हणत आहेत तिथे बिगरभाजप सरकार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी भाजपचे सरकार आहे त्या ठिकाणचा करोना पळून गेला कारण त्या ठिकाणी भाजपचे मुख्यमंत्री आहेत. तिथे काही नवीन धोरण केंद्राने तयार केले आहे का ? तसं नसेल तर मग केंद्राने असे आरोप राज्यांवर करुन नयेत,असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Read More : 

..हे तर ‘महावसूली’ सरकार अन् ‘जिथं जाऊ तिथं खाऊ’ ही मंत्र्यांची कामे : फडणवीस

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

…तर मग रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?, भाजपचा सवाल

‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

पंढरपूर : देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले – ‘…तर माझं नाव बदलून टाका’ (Video)

भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करणार, जयंत पाटलांचा इशारा

जयंत पाटलांनी घेतला संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार, सर्वत्र जोरदार चर्चा

सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’

Related Posts