IMPIMP

Mumbai News : महिलेचे संजय राऊतांवर गंभीर आरोप; कोर्टात गेलं प्रकरण; शिवसेना पुन्हा अडचणीत ?

by amol
congress should think about its performance gujarat municipal election says shiv sena mp sanjay raut

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)मुंबईतील एका महिला मानसोपचार तज्ज्ञानं शिवसेना नेते खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सदर महिलेनं मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. गेल्या 7 वर्षांपासून संजय राऊत आपला छळ करत आहेत असा गंभीर आरोप या महिलेनं केला आहे. संजय राऊत यांनी आपल्या मागे पाळत ठेवण्यासाठी माणसे लावली होती. हेरगिरी करणं, जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणं, शिवीगाळ करणं, धमक्या देणं असे अनेक गंभीर आरोप महिलेनं केले आहेत.

मुंबई हायकोर्टात या प्रकरणी 2 रिट याचिका दाखल झाल्या आहेत. आता त्यावरील पहिली सुनावणी 4 मार्च रोजी होणार आहे. न्यायमुर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमुर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढं अ‍ॅड. आभा सिंह यांनी अर्ज दाखल केला आहे.

2013 पासून आपला छळ सुरू असल्याचा आरोप महिलेनं केला आहे. यात आपल्यावर गंभीर शारीरिक हल्ला करण्यात आल्याचंही महिलेनं सांगितलं आहे. इतकंच नाही तर आपण मुंबई पोलिसात तक्रार केली होती, मात्र एफआयआर दाखल केल्यानंतरही मुंबई पोलिसांनी कोणती कारवाई केली नाही. संजय राऊत यांच्या राजकीय वजनामुळंच दबावाखाली येऊन मुंबई पोलिसांनी कोणती कारवाई केली नाही असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांना देखील याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे.
या सगळ्या प्रकरणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत दाद मागितली होती,
परंतु राऊत (Sanjay Raut) हे त्यांच्याच पक्षाचे असल्यानं याची कोणतीही दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही असा उल्लेखही याचिकेत आहे.

या सगळ्यानंतर आपण राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली.
आयोगानं नोंद घेत कारवाईचे आदेश दिले. परंतु बीकेसीच्या पोलीस उपायुक्तांनी अजूनही त्याची दखल घेतलेली नाही.
त्या उपायुक्तांनाही याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे.

‘धनंजय मुंडे, मेहबुब शेख अन् आता संजय राठोड; कारवाई नेमकी का होत नाही ?’ : चंद्रकांत पाटील

Related Posts