IMPIMP

Sharad Pawar | लखीमपूर घटनेवरून शरद पवार संतापले; म्हणाले – ‘मोदी सरकारची नियत कळाली, सत्ता हातात आहे म्हणून काहीही करणार का?’

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar became doctor honor dedicated farmers country in ahmednagar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–   Sharad Pawar | उत्तर प्रदेशातील लखीमपूर (Lakhimpur in Uttar Pradesh) मधील शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं धडक दिल्याच्या घटनेवरुन राष्ट्रवादी काॅग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदी सरकारवर निशाण साधला आहे. देशातील शेतकरी शांततेतच आंदोलनाचा प्रयत्न करतो. त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण ज्यापद्धतीने लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांवर हल्ला झाला त्यावरुन केंद्रातील सरकारची नियत कळाली. तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून काहीही करणार का? असा सवाल करत जोरदार टीका केली आहे. त्यावेळी ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

शरद पवार ( Sharad Pawar) म्हणाले, लखीमपूरमध्ये ज्यापद्धतीनं शेतकऱ्यांवर हल्ला केला गेला त्याचा मी निषेध व्यक्त करतो.
फक्त निषेध केल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांना शांती मिळणार नाही.
घटलेल्या घटनेची संपूर्ण जबाबदारी भाजपा (BJP), युपी सरकार (UP) आणि केंद्र सरकारची (Modi government) आहे.
याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या विद्यमान न्यायमूर्तींच्या नेतृत्त्वात सखोल चौकशी केली गेली पाहिजे.
आरोपींना तातडीनं कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यावेळी त्यांनी केली आहे.

पुढे शरद पवार म्हणाले की, शेतकऱ्याला त्याची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांची अशापद्धतीनं गळचेपी करणं योग्य नाही.
या घटनेनं केंद्र सरकारची नियत कळाली आहे. तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून त्याचा गैरवापर करू नका. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका.
नाहीतर तुम्हालाच ते भारी पडले. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यात तुम्हाली कधीच यश येणार नसल्याचं ते म्हणाले.

 

शेतकऱ्याला त्याची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांची अशापद्धतीनं गळचेपी करणं योग्य नाही.
या घटनेनं केंद्र सरकारची नियत कळाली आहे.
तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून त्याचा गैरवापर करू नका. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका.
नाहीतर तुम्हालाच ते भारी पडले. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यात तुम्हाली कधीच यश येणार नाही.
तर, तर त्यांनी लखीमपूरमधील घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडशी केली आहे.
युपीत सध्या जालियनवाला बाग हत्याकांडासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सरकारला संवेदनाच उरलेल्या नाहीत. हुकूमशाही राजवटीसारखं राज्य चालवलं जात असल्याचं शरद पवार म्हणाले.

 

Web Title : Sharad Pawar | sharad pawar lakhimpur violence attacks modi government demands inquiry under supreme court panel

 

हे देखील वाचा :

Kolhapur Crime | स्पर्धा परीक्षेत अपयश येत असल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Modi Government | मोठी खुशखबर ! दिवाळी बोनससोबत मिळेल 18 महिन्याचा DA एरियर, मोदी सरकार लवकरच करू शकते घोषणा

Kolhapur Crime | कोल्हापूर हादरलं ! 7 वर्षाच्या चिमुरड्याची हत्या?; हळद कुंकू लावून फेकून दिला होता मृतदेह, नरबळीचा संशय?

 

Related Posts