IMPIMP

संजय राऊतांची राज्यपालांवर टीका, म्हणाले – ‘जोपर्यंत ते 12 सदस्यांच्या नावाला मंजुरी देत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर टीका करणारच’

by pranjalishirish
shiv sena leader sanjay raut criticized maharashtra governor bhagat singh koshyari over appointment

सरकारसत्ता ऑनलाइन टीम –  जोपर्यंत राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत आम्ही राज्यपालांवर टीका करणारच असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. राजभवन हा राजकारणाचा अड्डा झाला आहे. त्यामुळं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर टीका होणारच असंही राऊत म्हणाले आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.

Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; जाणून घ्या पुणे-मुंबईतील आजचा भाव

आज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या एका शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भ्रष्टाचार, बदल्यांचं रॅकेट अशी सरकारविरोधातील 100 प्रकरणं त्यांनी सादर केली. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न केल्यानंतर त्यांनी यावर भाष्य केलं. याबाबत बोलताना राऊत Sanjay Raut  यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली.

घरचा आहेर देत ठाकरे सरकारमधील मंत्र्यानंच केलं ‘असं’ आवाहन, म्हणाले – ‘… तर अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा’

‘त्यांना भाजपचे कार्यकर्ते म्हटलं तर त्यात वावगं काय आहे ?’

संजय राऊत Sanjay Raut  म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं विरोधक त्यांना भेटायला गेले असतील. राज्यपालांना भाजपचे कर्यकर्ते म्हणण्यात गैर काय आहे ? राज्यपाल कोश्यारी हे संघात होते. भाजपचे मुख्यमंत्री देखील होते. त्यामुळं त्यांना भाजपचे कार्यकर्ते म्हटलं तर त्यात वावगं काय आहे ? मलाही कुणी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हटलं तर मला त्याचा अभिमान वाटेल असंही राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

‘भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण… ; निलेश राणेंची टीका

‘राजभवन राजकारणाचा अड्डा झालाय, 12 सदस्यांच्या नावाला मंजुरी मिळेपर्यंत त्यांच्यावर टीका होणारच’

पुढं बोलताना राऊत म्हणाले, राज्यपाल हे पद संवैधानिक आहे. त्या पदाचा मान राखला गेला पाहिजे हे मलाही कळतं. परंतु राज्यपालांचा मान विरोधकांनीच ठेवला नाही. राजभवन हा राजकारणाचा अड्डा झाला आहे. त्यामुळं त्यांच्यावर टीका होणारच. जोपर्यंत राज्यपाल 12 सदस्यांच्या नावाला मंजुरी देत नाही तोपर्यंत आम्ही टीका करत राहणार. राज्यपाल भाजपच्या दबावाखाली या फायलींवर सही करत नाहीत. या फाईलींमध्ये असं काय आहे की, ते या वर सही करत नाहीयेत ? असा सवालही राऊत Sanjay Raut  यांनी यावेळी उपस्थित केला.

Aslo Read : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

GROHE Hurun Report : मंगल प्रभात लोढा देशातील सर्वात ‘श्रीमंत’ बिल्डर, जाणून घ्या त्यांच्यासह इतर मोठया ग्रुपच्या संपत्तीबाबत

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

गृहमंत्री देशमुख यांच्यावरील कथित आरोप प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल, चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणा नेमण्याची मागणी

Related Posts