IMPIMP

’12 आमदारांच्या नियुक्या राज्यपालांनी खुर्चीत दडवून ठेवल्या’

by sikandershaikh
OBC Political Reservation | governor bhagat singh koshyari sing on prabhag rachna vidheyak which related to obc Political reservation maharashtra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) शिवसेनेचे (shivsena) मुखपत्र असलेल्या सामनातून आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. ‘बारा आमदारांच्या नियुक्या राज्यपालांनी खुर्चीत दडवून ठेवल्या आहेत,’ असा आरोप शिवसेनेनं केला आहे. ‘राज्यपालनियुक्त 12 सदस्यांची यादी राजभवनात कुणाच्या खुर्चीत दडवून ठेवली आहे ? राज्यपालांनी ठाकरे सरकारशी जो उभा दावा मांडला आहे, 12 आमदारांच्या नियुक्त्या ज्या पद्धतीने लटकवून ठेवल्या आहेत, हे घटनेच्या विरुद्ध आहे,’ असा आरोप शिवसेनेनं केला आहे.

‘राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी वगैरे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आता हे वादळ होणार म्हणजे नक्की काय होणार? नुसता गडगडाट होणार की मुसळधार असे काही घडणार? सध्याच्या काळात विधिमंडळात वादळ याचा अर्थ विरोधक सभागृहात गोंधळ घालणार, विधानसभा अध्यक्षांच्या समोर येऊन घोषणाबाजी करणार, सरकारविरोधात आरोळ्या ठोकणार, असा होतो. हेच वादळ असेल तर अशा वादळांची सरकारला आता सवय झाली आहे,’ असे रोखठोक उत्तर अग्रलेखात देण्यात आले आहे.

काय म्हटलं आहे ‘सामना’च्या अग्रलेखात….

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजधर्माचे पालन करीत आहेत. अर्थात हा धर्म पाळण्याची जबाबदारी विरोधी पक्षाचीदेखील आहेच व भाजपने नेमलेल्या राज्यपाल महोदयांची तर जास्तच आहे. राजधर्माचे पालन न करण्याचे हे काम आहे. मुख्यमंत्र्यांनी राजधर्माचे पालन केल्याने विरोधकांच्या तथाकथित वादळातील हवाच गेली. राज्यपाल, विरोधी पक्ष राजधर्म कधी पाळणार?

पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही, असा शड्डू विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी ठोकला होता (वनमंत्री राठोड यांनी राजीनामाच दिल्याने हे शड्डू आता पोकळच ठरले आहेत). अर्थात या प्रकारची भाषा विरोधी पक्षनेत्यांच्या तोंडी शोभत नाही व त्यामुळे वादळ वगैरे निर्माण होण्याची सुतराम शक्यता नाही.

पूजा चव्हाण यांचे प्रकरण नक्कीच गूढ आणि चिंताजनक आहे.
विरोधी पक्षाला तिच्या मृत्यूची चिंता वाटणे स्वाभाविक आहे, पण चिंता वाटणे आणि त्याचे भांडवल करणे यात फरक आहे.
अशी चिंता मग राज्यातील प्रत्येक संशयास्पद मृत्यूप्रकरणी वाटायला हवी.
दादरा-नगर हवेलीचे लोकप्रिय खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन गूढ पद्धतीने आत्महत्या केली.
आपण का आत्महत्या करत आहोत? आपल्या आत्महत्येस जबाबदार कोण? हे सर्व त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवले.
त्यात भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख लोकांचा उल्लेख आहे, पण मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत भाजपच्या मंडळींना काहीच वाटत नाही.

‘राजकारणासाठी माझ्या मुलीचे काहीही फोटो, व्हिडीओ दाखवले जात आहेत’ – पूजाचे वडील लहू चव्हाण

Related Posts