IMPIMP

भाजपच्या महिला आमदाराचं ‘हे’ Tweet सरकारच्या जिव्हारी लागणार ?

by amol
Shweta Mahale

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, हत्यांच्या घटना आणि सरकारकडून मंत्र्यांची होणारी पाठराखण यावरून आता राज्यात संतापाचं वातावरण दिसत आहे. भाजपच्या आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांनी या संपूर्ण घटनांवर ट्विट करत भाष्य केलं आहे. त्याचं हे ट्विट अतिशय खोचक, उद्वेग व्यक्त करणारं, उपरोधिक आणि सराकरच्या जिव्हारी लागणारं आहे.

‘मुंडे, शेख वाघमारे, राठोड अगदी निरागस; धोका सचिन, लतादीदी, अमिताभकडून’

श्वेता महाले Shweta Mahale यांनी ट्विट करत लिहिलं की, पूजा चव्हाणनं आत्महत्या केली, हिरेन मनसुखनं आत्महत्या केली. जळगावच्या त्या महिलेनं गरमी होत असल्यानं झगा काढून ठेवला होता. ज्यांच्यावर बलात्कार झालेत त्यात त्या महिलांची चूक होती. मुंडे, शेख वाघमारे, राठोड अगदी निरागस आहेत आणि राज्याला धोका सचिन, लतादीदी, अमिताभ, अक्षय कडून आहे असं म्हणत महाले यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

पुरावे नष्ट होण्याची शक्यता

आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एएनआयकडे जाईपर्यंत सर्व पुरावे नष्ट होण्याची शक्यता अधिक आहे. मग कुठलीही यंत्रणा लावा फार काह निष्पन्न होणार नाही असं आधीच्या सुशांत आणि दिशा प्रकरणावरून लक्षात येऊ शकेल. त्यामुळं 4 दिवस न्यूज चॅनेलला टीआरपी मिळेल, एवढंच काय यातून निष्पन्न होईल असंही त्या म्हणाल्या आहेत.

महाले यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे. सध्या सोशल मीडियावर या ट्विटची खूप चर्चा सुरू आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देताना संपात व्यक्त केला आहे. काहींनी राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी केली आहे. काहींनी राज्याचे गृहमंत्री हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे.

कोण आहेत आमदार श्वेता महाले ?

श्वेता महाले  Shweta Mahale या बुलढाण्यातील चिखली विधानसभेच्या आमदार आहेत. त्या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांचा पराभव केला. 2004 नंतर चिखली मतदारसंघात पहिल्यांदाच भाजप उमेदवाराचा विजय झाला होता. त्या जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती होत्या.

Related Posts